Latest News

6/recent/ticker-posts

आमदार बाबासाहेब पाटील यांचा सत्कार

 आमदार बाबासाहेब पाटील यांचा सत्कार

चाकूर : विधानसभा मतदारसंघाचे नवनिर्वाचित आमदार बाबासाहेब पाटील यांचा सत्कार अहमदपूरचे माजी उपनगराध्यक्ष मुजीब पटेल जागीरदार यांच्या वतीने इंद्रायणी निवासस्थानी करण्यात आला.

या कार्यक्रमाला मौलाना आझाद पतसंस्थेचे चेअरमन नसिबोद्दीन जागीरदार, मुख्याध्यापक मजीद जागीरदार, राष्ट्रवादी शिक्षक संघाचे जिल्हाध्यक्ष मदन धुमाळ, नगरपरिषदेचे गटनेते डॉ. फुजेल जागीरदार, वसीम जागीरदार, चाकूर तालुकाध्यक्ष दयानंद झांबरे आणि लातूर विभागीय बोर्डाचे सदस्य प्रा. वैजनाथ सुरनर यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.

यावेळी आमदार बाबासाहेब पाटील यांनी आपल्या भाषणात मतदारसंघाच्या चौफेर विकासासाठी कटिबद्ध असल्याचे सांगितले. "सर्वसामान्यांचे प्रश्न सोडविण्यास प्राधान्य देत मतदारसंघाला विकासाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी मी नेहमी प्रयत्नशील राहीन," असे ते म्हणाले. उपस्थितांनी आमदार पाटील यांना त्यांच्या भावी कार्यासाठी शुभेच्छा दिल्या.

Post a Comment

0 Comments