विवेकानंद चौक पोलिसांचे नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन
लातूर : 30 डिसेंबर - सोमवारी वेळअमावस्या निमित्त विवेकानंद चौक पोलिसांनी शहरातील नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन केले. ऑटोला स्पीकर लावून विवेकानंद चौक पोलीस ठाण्याच्या हद्दीतील नागरिकांना वेळअमावस्या सणाच्या पार्श्वभूमीवर घराबाहेर पडताना काळजी घेण्याची सूचना देण्यात आली.
वेळअमावस्या हा सण लातूर जिल्ह्यात मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. यावेळी शेताकडे जाणारे नागरिक, तसेच सर्व वयोगटातील लोक कुटुंबासह सण साजरा करण्यासाठी बाहेर पडतात. त्यामुळे शहरातील रस्ते सोडून इतर सर्व ठिकाणे सुनसान होतात. यामुळे विवेकानंद चौक पोलीस ठाण्याच्या हद्दीतील नागरिकांना सावध राहण्याचे आवाहन केले गेले आहे.
पोलीस निरीक्षक संतोष पाटील यांनी नागरिकांना सांगितले की, 'सम्भाव्य सुरक्षा धोके टाळण्यासाठी घराबाहेर जाताना घराचे कुलूप लावून सुरक्षितता सुनिश्चित करावी.'आज रात्री 7:30 वाजता पोलिसांनी ऑटोमध्ये स्पीकर लावून हे आवाहन केले आणि सर्व नागरिकांना आदेशांचे पालन करण्याची विनंती केली.
0 Comments