Latest News

6/recent/ticker-posts

क्रीडा सप्ताहअंतर्गत स्पर्धामधील विजेत्यांना बक्षीस वितरण

क्रीडा सप्ताहअंतर्गत स्पर्धामधील विजेत्यांना बक्षीस वितरण


लातूर : दि. 20 - क्रीडा संस्कृतीची जोपासना व जनतेत क्रीडा विषयक प्रोत्साहनात्मक वातावरण निर्माण होण्याच्या उद्देशाने जिल्ह्यात दि. 12 ते 18 डिसेंबर या कालावधीत क्रीडा सप्ताह साजरा करण्यात आला. याअंतर्गत आयोजित क्रीडा सप्ताहानिमित्ताने जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय लातूर यांच्यामार्फत 12 ते 18 डिसेंबर, 2024 या कालावधीत जिल्ह्यात विविध क्रीडा स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेतील विजयी खेळाडूंना जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयामार्फत पदके आणि प्रमाणपत्र देवून गौरविण्यात आले. तसेच जिल्हा क्रीडा संकुल येथे लातूर जिल्ह्यातील कुस्ती व जिम्नॅस्टीक खेळांच्या खेळाडूंनी प्रात्यक्षीके सादर करण्यात आले.

याप्रसंगी जिल्हा क्रीडा अधिकारी जगन्नाथ लकडे यांनी खेळाडूंना खेळामध्ये उत्कृष्ट कामगिरी करण्यासाठी गुरूमंत्र दिला. याप्रसंगी नेताजी जाधव, ॲथेलॅटीक्स कोच समाधान बुरगे, राहुल होनसांगळे, लायक सय्यद, अमजद शेख, जिम्नॅस्टीक कोच आशा झुंजे, कुस्तीकोच चेतन जावळे, तालुका क्रीडा अधिकारी सुरेंद्र कराड, क्रीडा अधिकारी कृष्णा केंद्रे, धीरज बावणे, बाबासाहेब इंगोले, सागर पोतदार, प्रसाद वैद्य आदी उपस्थित होते.

कार्यक्रमप्रसंगी जिल्ह्यातील विविध खेळाच्या स्पर्धांमध्ये प्राविण्य प्राप्त केलेल्या विजयी खेळाडूंना प्रमाणपत्र व पदकांचे वाटप प्रमुख अतिथींच्या हस्ते करण्यात आले. या कार्यक्रमाचे सूत्रसंचलन क्रीडा अधिकारी कृष्णा केंद्रे यांनी केले तर आभार तालुका क्रीडा अधिकारी सुरेंद्र कराड यांनी मानले. कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी जिल्हा क्रीडा अधिकारी जगन्नाथ लकडे यांच्या मार्गदर्शनाखाली तालुका क्रीडा अधिकारी सारीका काळे, सुरेंद्र कराड, राज्य क्रीडा मार्गदर्शक जयराज मुंढे, चंद्रकांत लोदगेकर,  क्रीडा अधिकारी कैलास लटके, कृष्णा केंद्रे, धीरज बावणे, बाबासाहेब इंगोले, प्रवीण कांबळे, चेतन जावळे, गणेश वंगवाड, तेजस गोरे, प्रसाद वैद्य यांनी प्रयत्न केले. 

Post a Comment

0 Comments