बाबासाहेब पाटील यांच्या कॅबिनेट मंत्रीपदी शपथविधीचा जल्लोष
निटूर : बाजार चौक, जानी चौक सह बस स्टॉप परिसरात बाबासाहेब पाटील यांच्या कॅबिनेट मंत्रीपदी शपथविधी सोहळ्यानिमित्त उत्साहपूर्ण वातावरण होते. या प्रसंगी छत्रपती शाहू माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयाचे प्राचार्य तथा सरपंच प्रतिनिधी अनिल सोमवंशी {पाटील} स्थानिक कार्यकर्त्यांनी एकत्र येत जल्लोष साजरा केला.
कार्यक्रमात प्रा. संतोष सोमवंशी,जलील शेख, बाळकृष्ण डांगे, विजय देशमुख, दिनकर कवडे, ईश्वर हासबे, दिलीप देशमुख, खदीर गस्ते, सिकंदर कांबळे आदी उपस्थित होते या वेळी फटाक्यांची आतषबाजी करण्यात आली तसेच पेढे वाटप करून आनंद व्यक्त करण्यात आला. कार्यकर्त्यांच्या उपस्थितीने बाजार चौकात, बस स्टॉप परिसरात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले होते.
0 Comments