शालेय जिल्हास्तरीय ट्रॅडिशनल (बेल्ट व मास) रेसलिंग स्पर्धा उत्साहात
लातूर : येथे दिनांक 11 डिसेंबर रोजी जिल्हा क्रीडा संकुलात क्रीडा व युवक सेवा संचालनालय, महाराष्ट्र राज्य, पुणे यांच्या अंतर्गत जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, लातूर महानगरपालिका, लातूर शहर व जिल्हा ट्रॅडिशनल रेसलिंग असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने शालेय जिल्हास्तरीय ग्रामीण व शहरी ट्रॅडिशनल (बेल्ट व मास) रेसलिंग क्रीडा स्पर्धा - 2024-25 उत्साहात पार पडल्या. स्पर्धेचे उद्घाटन PATM फाउंडेशनचे अध्यक्ष सरफराज (बाबा) मणियार यांच्या हस्ते करण्यात आले. या स्पर्धेतून लातूर जिल्ह्याचा संघ निवडण्यात आला.
तालुका क्रीडा अधिकारी सुरेंद्र कराड व रेसलिंग कोच चेतन जावळे यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच तज्ञ पंचांच्या निरीक्षणाखाली स्पर्धेचे आयोजन करण्यात आले. मास रेसलिंग व बेल्ट रेसलिंग या प्रकारांत जिल्हाभरातील खेळाडूंनी मोठ्या प्रमाणात सहभाग नोंदवला. राष्ट्रीय खेळाडू व पंच के. वाय. पटवेकर आणि ज्येष्ठ क्रीडा मार्गदर्शक खय्युम तांबोळी यांनी सामनाधिकारी म्हणून जबाबदारी सांभाळली. तसेच पंच म्हणून राष्ट्रीय खेळाडू विक्रम गायकवाड, विश्वजीत येणकुरे व शुभम बोडके यांनी कार्य पाहिले.
स्पर्धा यशस्वी करण्यासाठी विक्रम गायकवाड, अजमेर शेख, व विष्णुदास इंगलवाड यांनी विशेष परिश्रम घेतले. स्पर्धेचे सूत्रसंचालन के. वाय. पटवेकर यांनी केले. स्पर्धेदरम्यान प्रा. चंद्रकांत कदम, प्रा. संतोष सोमवंशी, रवी बिरादार यांच्यासह क्रीडा प्रशिक्षक, पालक आणि खेळाडू मोठ्या संख्येने उपस्थित होते.
0 Comments