सैन्य दलात प्रशिक्षण पूर्ण करून आलेल्या माजी विद्यार्थ्यांचा सत्कार
निटूर : येथील महाराष्ट्र विद्यालयात शाळेचा माजी विद्यार्थी अविनाश दुधाची राठोड यांचा भारतीय सैन्य दलात भरती झाल्यानंतर खडतर प्रशिक्षण पूर्ण केल्याबद्दल सत्कार करण्यात आला. कार्यक्रमात मुख्याध्यापक सुरेंद्र धुमाळ आणि पत्रकार के. वाय. पटवेकर यांच्या हस्ते त्यांचा सत्कार करण्यात आला व भावी वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.
यावेळी अविनाश राठोड यांनी आपले मनोगत व्यक्त करताना सैन्य दलातील प्रशिक्षणाचा अनुभव व त्यासाठी लागणारे शारीरिक व मानसिक कौशल्य याविषयी विद्यार्थ्यांना प्रेरणादायी माहिती दिली. त्यांच्या मनोगतातून विद्यार्थ्यांना देशसेवेचे महत्त्व समजावले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन नरसिंग पाटील यांनी केले. या वेळी शाळेतील शिक्षक माणिक नाईकवाडे, हनुमंत भुईबार, रवींद्र सूर्यवंशी, विशाल जाधव, अनिल देशमुख, राजाभाऊ निटुरे, तय्यब फकीर यांसह मोठ्या संख्येने विद्यार्थी उपस्थित होते. कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी शाळेच्या शिक्षक व कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले. कार्यक्रमाने विद्यार्थ्यांमध्ये देशसेवेची भावना रुजवण्याचे महत्त्व अधोरेखित केले.
0 Comments