राज्यस्तरीय शालेय कराटे स्पर्धेत प्रगती जाधवला कास्यपदक
लातूर : क्रीडा व युवक सेवा संचालनालय, महाराष्ट्र राज्य, पुणे अंतर्गत जिल्हा क्रीडा परिषद व क्रीडा अधिकारी कार्यालय, धुळे यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित राज्यस्तरीय शालेय कराटे क्रीडा स्पर्धा सन 2024-25 मध्ये इंटरनॅशनल फुनाकोशी शोतोकान कराटे असोसिएशनच्या विद्यार्थ्यांनी उल्लेखनीय यश संपादन केले आहे.
या स्पर्धेत प्रगती जाधवने चमकदार कामगिरी करत कास्यपदक (ब्राँझ मेडल) पटकावले. क्रीडा अधिकारी, धुळे यांच्या मार्गदर्शनाखाली ही स्पर्धा यशस्वीरीत्या पार पडली.
स्पर्धेसाठी विद्यार्थ्यांना शिहान आजमीर शेख यांचे विशेष प्रशिक्षण आणि मार्गदर्शन लाभले. प्रशिक्षक वीशद कांबळे, रेहान शेख यांचेही मोलाचे मार्गदर्शन मिळाले. प्रगती जाधवच्या या यशाबद्दल पालक, मित्रमंडळी, तसेच कराटे संघटनेच्या सदस्यांनी तिचे अभिनंदन केले व तिला पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.
0 Comments