68 वी राष्ट्रीय जलतरण क्रीडा स्पर्धा 2024-25 मध्ये महाराष्ट्राचा शानदार विजय
पुणे : { क्रीडा प्रतिनिधी/मुस्तफा सय्यद } SGFI द्वारे आयोजित 68 वी राष्ट्रीय जलतरण क्रीडा स्पर्धा 2024-25 गुजरात राज्यातील सरदार वल्लभभाई पटेल जलतरण तलाव, राजकोट येथे यशस्वीरीत्या पार पडली. या स्पर्धेत महाराष्ट्राच्या संघाने चमकदार कामगिरी करत सर्वसाधारण विजेतेपदावर आपले नाव कोरले.
महाराष्ट्र संघाचे नियोजन महादेव कसगावडे- जिल्हा क्रीडा अधिकारी पुणे यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आले. तसेच क्रीडा व युवा सेवा संचालनालय, पुणे येथील सहसंचालक सुधीर मोरे आणि मुख्य मार्गदर्शक बालाजी केंद्रे यांचे मोलाचे मार्गदर्शन संघाला लाभले. संघ व्यवस्थापक म्हणून डी. एन. तलावाडे यांनी महत्त्वाची जबाबदारी यशस्वीपणे पार पाडली.
संघाच्या रवाना होण्यापूर्वी संचालनालयातील अधिकारी, कर्मचारी आणि क्रीडाप्रेमींनी खेळाडूंना शुभेच्छा दिल्या. जलतरण आणि डायव्हिंग या दोन्ही क्रीडा प्रकारांमध्ये महाराष्ट्राच्या खेळाडूंनी आपली सर्वोत्तम कामगिरी सादर केली. स्पर्धेच्या अखेरीस विजयी खेळाडूंनी आपल्या विजयाचा जल्लोष साजरा केला.
0 Comments