14 ते 27 डिसेंबर दरम्यान सैन्य भरती मेळावा
लातूर :(जिमाका) दि. 4 - पुणे येथील मुख्यालय सैन्य भरती कार्यालयामार्फत 14 ते 27 डिसेंबर 2024 या कालावधीत अहमदनगर, बीड, लातूर, धाराशिव, पुणे आणि सोलापूर या सहा जिल्ह्यांतील नवयुवकांसाठी सैन्य भरती मेळावा आयोजित करण्यात आला आहे. हा मेळावा मेकनाइज्ड इन्फंट्री सेंटर आणि स्कूल, अहमदनगर येथे होणार आहे.
लातूर जिल्ह्यातील पात्र उमेदवारांनी या संधीचा लाभ घ्यावा व मेळाव्यात मोठ्या संख्येने सहभाग नोंदवावा, असे आवाहन जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी ले. कर्नल शरद पांढरे (नि.) यांनी एका प्रसिद्धी पत्रकाद्वारे केले आहे.
0 Comments