Latest News

6/recent/ticker-posts

लातूर जिल्हास्तरीय शालेय कराटे स्पर्धा उत्साहात संपन्न

लातूर जिल्हास्तरीय शालेय कराटे स्पर्धा उत्साहात संपन्न


लातूर : (प्रतिनिधी/विक्रम गायकवाड): क्रीडा व युवक सेवा संचालनालय, महाराष्ट्र राज्य पुणे आणि राज्य क्रीडा परिषदेच्या वतीने आयोजित कराटे, किक बॉक्सिंग, आणि तायक्वांदो या खेळांच्या जिल्हा, विभागीय, व राज्यस्तरीय स्पर्धा संघटनेतील वादामुळे स्थगित करण्यात आल्या होत्या. परंतु क्रीडा आयुक्तांनी पर्यायी मार्ग काढत स्पर्धा घेण्यासाठी मार्ग मोकळा केला. यामुळे राज्यातील लाखो खेळाडूंना मोठ्या नुकसानीपासून वाचवण्यात आले.

लातूर येथील जिल्हा क्रीडा संकुलात दिनांक 21 व 22 नोव्हेंबर रोजी जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय आणि जिल्हा क्रीडा परिषदेच्या वतीने जिल्हास्तरीय शालेय मनपा आणि ग्रामीण कराटे स्पर्धा उत्साहात पार पडल्या. या स्पर्धेतून लातूर जिल्ह्याचा संघ निवडण्यात आला. स्पर्धेचे आयोजन तालुका क्रीडा अधिकारी सुरेंद्र कराड, कैलास लटके यांच्या देखरेखीखाली आणि तज्ञ पंचांच्या निरीक्षणाखाली स्पर्धा आयोजित करण्यात आल्या. 21 नोव्हेंबर रोजी झालेल्या मनपा स्पर्धेत 250 खेळाडूंनी सहभाग घेतला, तर 22 नोव्हेंबर रोजी ग्रामीण स्पर्धेत 150 खेळाडूंनी सहभाग नोंदवला.

या स्पर्धेमध्ये राष्ट्रीय खेळाडू व राष्ट्रीय पंच अजमेर शेख यांनी सामनाधिकारी म्हणून जबाबदारी सांभाळली. तसेच पंच म्हणून संदीप पवार, दत्ता कदम, अजित ढोले, विशद कांबळे, तुषार अवस्थी, गणेश काकडे, आणि वसीम शेख यांनी काम पाहिले.


 स्पर्धा यशस्वी करण्यासाठी संपत साळुंखे, सुधाकर उळेकर, बाबाजी जायभाय, सुरेखा गिरी, रिहान शेख व त्यांच्या टीमने विशेष परिश्रम घेतले. स्पर्धेदरम्यान ज्येष्ठ क्रीडा मार्गदर्शक खय्युम तांबोळी, स्पोर्ट्स केम्पो महाराष्ट्र असोसिएशनचे सचिव- के.वाय.पटवेकर, अभिनेते- रवी कुमार शिंदे, थायबॉक्सिंग चे फरान नबीजी, राजेश भालेराव यांच्यासह क्रीडा प्रशिक्षक, पालक, आणि खेळाडू उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments