Latest News

6/recent/ticker-posts

लातूर जिल्हा रुग्णालयासाठी तृप्ती देसाईंनी घेतली आरोग्यमंत्री सावंत यांची भेट

लातूर जिल्हा रुग्णालयासाठी तृप्ती देसाईंनी घेतली आरोग्यमंत्री सावंत यांची भेट

लातूर : लातूर जिल्हा रुग्णालयाचा बहुचर्चित प्रलंबीत प्रश्न मार्गी लावावा यासाठी भूमाता ब्रिगेडच्या संस्थापिका अध्यक्षा तथा महिलांच्या हक्कासाठी लढणाऱ्या तृप्ती देसाई यांनी आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांची त्यांच्या पुणे येथील निवासस्थानी भेट घेतली. लातूरकरांच्या या आग्रही मागणीचे निवेदन माझं लातूर परिवाराच्या वतीने सावंत यांना देण्यात आले.

गेल्या काही वर्षांपासून प्रलंबित असलेल्या लातूर जिल्हा रुग्णालयाचा रखडलेला प्रश्न मार्गी लावावा यासाठी माझं लातूर परिवाराच्या वतीने सातत्याने आंदोलने आणि पाठपुरावा करण्यात येत आहे. २९ सप्टेंबर २०२४ रोजी लातूर शहरात भीक मागो आंदोलन करून शासनाचे लक्ष वेधले होते या आंदोलनात तृप्ती देसाई यांनी स्वतः सहभागी होत आंदोलनाला पाठिंबा दिला होता. ५ ऑक्टोबर २०२४ रोजी देसाई यांनी आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांच्या पुणे येथील निवासस्थानी भेट घेऊन लातूरकरांच्या तीव्र भावना कळविल्या यासोबतच माझं लातूर परिवाराच्या वतीने निवेदन सादर करून या विषयावर त्वरित निर्णय घेण्याची विनंती केली. याप्रकरणी आपण निधीसाठी प्रस्ताव पाठविला असून हा निधी उपलब्ध होताच जिल्हा रूग्णालय उभारणीचा मार्ग मोकळा होईल असा विश्वास सावंत यांनी व्यक्त केला आहे. येत्या काही दिवसात आपण लातूर जिल्हा रूग्णालयासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांची मंत्रालयात भेट घेणार असल्याचे यावेळी देसाई यांनी सांगितले.

Post a Comment

0 Comments