देहराडून-उत्तराखंड येथे बाराव्या ऑल इंडिया ट्रॅडिशनल रेसलिंग अँड पॅनक्रेशन चॅम्पियनशिपमध्ये अशफाक तांबोळी चमकला
पुणे :(क्रीडा प्रतिनिधी/मुस्तफा सय्यद) दि. 3 ते 6 ऑक्टोबर 2024 रोजी पेड ग्राउंड, देहराडून-उत्तराखंड येथे 12 व्या ऑल इंडिया ट्रॅडिशनल रेसलिंग अँड पॅनक्रेशन चॅम्पियनशिपचे आयोजन करण्यात आले होते, या राष्ट्रीय स्पर्धेत मूळचा लातूर जिल्ह्यातील हाळी येथील सध्या पुणे येथे वास्तव्यात असलेला मार्शल आर्ट खेळाडू अशफाक तांबोळी यांनी देशभरातील सर्वोत्तम खेळाडूंविरुद्ध खेळताना पॅनक्रेशन MMA लाईट कॉन्टॅक्ट मध्ये सुवर्ण पदक व पॅनक्रेशन MMA फुल कॉन्टॅक्ट मध्ये रौप्य पदक मिळवले.
उत्तराखंड ट्रॅडिशनल रेसलिंग अँड पॅनक्रेशन असोसिएशनच्या आयोजनाखाली ही स्पर्धा पार पडली. ज्यामध्ये 450 पेक्षा जास्त खेळाडू, प्रशिक्षक व पंचांनी सहभाग घेतला. 20 पेक्षा जास्त राज्यांमधून खेळाडूंनी विविध गटांमध्ये आपल्या कौशल्याचे प्रदर्शन केले. हरियाणा राज्याने चॅम्पियनशिपचे विजेतेपद पटकावले तर नागालँड दुसऱ्या क्रमांकावर आणि राजस्थान तिसऱ्या क्रमांकावर राहिले. ही प्रतिष्ठित स्पर्धा भारतीय सैन्य दलातील सेवानिवृत्त अधिकारी तथा वरिष्ठ क्रीडा मार्गदर्शक सी.ए. तांबोळी व ओमरमुख्तार तांबोळी- अखिल भारतीय पारंपरिक कुस्ती आणि पॅनक्रेशन महासंघाचे अध्यक्ष यांच्या मार्गदर्शनाखाली यशस्वीरीत्या पार पडली. पारंपरिक कुस्ती आणि मार्शल आर्ट्स क्षेत्रातील भारताच्या वाढत्या प्रतिभेचे हे एक मोठे प्रदर्शन होते. अशफाक तांबोळी यांनी महाराष्ट्राला दोन पदक मिळवून दिल्याबद्दल स्पोर्ट केम्पो महाराष्ट्र असोसिएशनचे अध्यक्ष अलीमभाई तांबोळी, बापू घुले, आत्माराम घोगरे, गोरखनाथ मोरे, पत्रकार- के वाय पटवेकर व मित्र परिवारातून अभिनंदन होत आहे अशफाक तांबोळी यांना प्रशिक्षक- ओमरकासीम तांबोळी यांचे मार्गदर्शन लाभले.
0 Comments