रोटरी क्लब ऑफ लातूर मेट्रोच्या वतीने बस स्थानकामध्ये प्रवाशासाठी मोफत ब्लड शुगर तपासणी शिबिर
लातूर : शहरातील मध्यवर्ती ठिकाणी असलेल्या मुख्य बस स्थानकामध्ये आज दिनांक 6 ऑक्टोबर रोजी सकाळी 11:00 वाजल्यापासून दुपारी 2:00 वाजेपर्यंत नवरात्री निरामय चॅलेंज प्रकल्प अंतर्गत रोटरीन कालिदास लांडगे यांच्या अध्यक्षतेखाली मोफत ब्लड शुगर तपासणी शिबिराचे बस स्थानकातील प्रवाशांसाठी आयोजन करण्यात आले होते या शिबिरात सकाळी 11:00 ते दुपारी 2:00 वाजेपर्यंत प्रवाशांची मोफत ब्लड व शुगर तपासणी करण्यात आली.
यावेळी रोटरी क्लब ऑफ लातूर मेट्रोचे अध्यक्ष कालिदास लांडगे शेकरेटी विजय कोळी प्रोजेक्ट डायरेक्टर राजेंद्र कासले, नागनाथ आगवणे, गंगाधर गवळी, गोविंद काळे, दयानंद वडेकर, विष्णू कोल्हे आदींची उपस्थिती होती.
0 Comments