पत्रकार नरसिंह घोणे यांनी लातूर शहर विधानसभा निवडणुकीसाठी अर्ज दाखल केला
लातूर : पत्रकार नरसिंह घोणे यांनी 28 ऑक्टोबर रोजी दिवाळीच्या वसुबारसच्या शुभमुहूर्तावर लातूर शहर विधानसभा मतदारसंघातून उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. पत्रकार म्हणून त्यांनी दीर्घकाळ सामाजिक आणि राजकीय प्रश्नांवर आपले स्पष्ट विचार मांडले आहेत.
जनतेच्या समस्यांवर आवाज उठवणारे घोणे हे पत्रकारितेतील एक मान्यवर नाव असून ते लातूर जिल्हा मराठी पत्रकार संघाचे जिल्हाध्यक्ष आहेत. त्यांच्या उमेदवारीमुळे लातूर शहरातील निवडणुकीला एक नवी दिशा मिळण्याची शक्यता आहे. नरसिंह घोणे यांचा उमेदवारी अर्ज भरतानाच्या सोहळ्याला विक्रम पांडे, उमेश कांबळे, मुरलीधर चेंगटे, के वाय पटवेकर, बालाजी वाघलगावे, विजय कुलकर्णी, दीपक गंगणे, राजकुमार गाथाडे, गणेश मुळे, हरी गोटेकर आणि इतर अनेक पत्रकार व कार्यकर्ते तहसील परिसरात उपस्थित होते. उपस्थितांनी घोणे यांच्या उमेदवारीला पाठिंबा दर्शवला व त्यांना यश मिळावे अशी अपेक्षा व्यक्त केली. अन्य उमेदवारांची यादी काल दिवसभरात लातूर शहर मतदारसंघातील 235 विधानसभा जागेसाठी विविध उमेदवारांनीही आपले अर्ज दाखल केले. यामध्ये राजीव ऊर्फ राजकुमार पाटील (अपक्ष), लालासाहेब शेख (अपक्ष), प्रसाद सिद्राम कोळी (अपक्ष), पंकज रावसाहेब देशमुख (अपक्ष), मंगेश नागनाथ ईळेकर (अपक्ष), रावसाहेब सिद्राम करपे (राष्ट्रीय समाज पक्ष), आश्विन सुभाषराव नलबले (अपक्ष - अर्ज 2), घोणे नरसिंह पांडूरंग (निर्भय महाराष्ट्र पार्टी व अपक्ष - अर्ज 2), आणि अनिल गोरोबा गायकवाड (आर.पी.आय ए) यांचा समावेश आहे.
0 Comments