Latest News

6/recent/ticker-posts

अखेर क्रीडा आयुक्तांनी तिडा सोडविला जिल्हास्तर तायक्वांदो स्पर्धेला सुरुवात

अखेर क्रीडा आयुक्तांनी तिडा सोडविला जिल्हास्तर तायक्वांदो स्पर्धेला सुरुवात




लातूर : {क्रीडा प्रतिनिधी/अजमेर शेख} क्रीडा व युवक सेवा संचनालय महाराष्ट्र राज्य पुणे राज्य क्रीडा परिषद यांच्या वतीने घेण्यात येणाऱ्या तायक्वांदो, कराटे, किक बॉक्सिंग या खेळाच्या जिल्हा विभाग व राज्यस्तरीय स्पर्धा संघटनेतील वादामुळे स्थगित ठेवण्यात आल्या होत्या. त्यावर पर्यायी मार्ग काढून क्रीडा आयुक्तांनी स्पर्धा घेण्यासाठी मार्ग मोकळा केल्यामुळे राज्यातील लाखो  खेळाडूंचे नुकसान होण्यापासून वाचले असून लातूर येथील जिल्हा क्रीडा संकुल येथे जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय व जिल्हा क्रीडा परिषद यांच्या वतीने दिनांक 19 व 20 ऑक्टोबर रोजी जिल्हास्तर शालेय मनपा व ग्रामीण तायक्वांदो स्पर्धेला सुरुवात झाली असून लातूर जिल्ह्याचा संघ निवड प्रक्रिया सुरू आहे. या स्पर्धेचे उद्घाटन पत्रकार के वाय पटवेकर यांच्या हस्ते करून स्पर्धा यशस्वीरित्या आयोजित करण्यात आले आहे.

या स्पर्धेला जिल्हा क्रीडा अधिकारी निवड समितीचे प्रमुख असून पूर्ण लक्षपूर्वक विभागीय स्पर्धेसाठी लातूर जिल्ह्याचा संघ निवडला जात आहे. काल 19 ऑक्टोबर रोजी झालेल्या मनपा स्पर्धेत 250 खेळाडूंनी सहभाग नोंदवला तर आज 20 ऑक्टोबर रोजी ग्रामीण स्पर्धेत 120 खेळाडू सहभागी झाले आहेत. असे प्रसिद्धीत दिलेल्या पत्रकात म्हटले आहे. यावेळी सामनाधिकारी म्हणून एन आय एस प्रशिक्षक तथा राष्ट्रीय पंच नेताजी जाधव काम पाहत आहेत तर ऑल इंडिया युनिव्हर्सिटी खेळाडू तथा राज्य पंच एस व्हि कुलकर्णी, धनश्री मदने, जानवी मदने, श्रद्धा कुलकर्णी, आसावरी कुलकर्णी हे पंच म्हणून काम पाहत आहेत. 

यावेळी क्रीडा अधिकारी कृष्णा केंद्रे, कराटे प्रशिक्षक- अजमेर शेख, तायक्वांदो जिल्हा संघटनेचे कोषाध्यक्ष प्रयागराज गरुड, एन आय एस कुस्ती प्रशिक्षक बिराजदार, क्रीडा शिक्षक महेश, स्वप्निल मुळे, यांच्यासह क्रीडा प्रशिक्षक पालक व खेळाडू उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments