राज्यस्तरीय किकबॉक्सिंग स्पर्धेत लातूरचे खेळाडू चमकले
लातूर :{ क्रीडा प्रतिनिधी/काशिनाथ आप्पा बळवंते} दिनांक 27 ते 29 सप्टेंबर 2024 सिल्वरओक शिर्डी जि. अहमदनगर येथे पार पडलेल्या राज्यस्तरीय किकबॉक्सिंग स्पर्धेत रुरल अँड अर्बन किक बॉक्सिंग असोसिएशन, लातूर च्या विद्यार्थ्यांनी एकूण 15 पदकांची कमाई करत यश संपादन केले.
यामध्ये सार्थक मद्देवाड़- दुहेरी स्वर्ण पदक, दत्ता फड़- दुहेरी रजत पदक - कांस्य पदक, नमन गायकवाड़- स्वर्ण पदक, गोविंद फुले- रजत पदक, पीयूष कल्याणकर- कांस्य पदक, जयराज महालिंगे- कांस्य पदक, श्रीकर शिंदे- कांस्य पदक, व्यंकटेश सालगर- कांस्य पदक, रुद्र वाघमारे- सुवर्ण पदक, सूरज चावरे- रजत पदक, उजैर सैयद- रजत पदक, दत्ता फड़- कांस्य पदक, वेदांत क्षीरसागर- सुवर्णपदक, शुभम बोडके- सुवर्णपदक यांनी यश संपादन केले. एकूण सुवर्ण पदक : 6 , रजत पदक : 4 , कास्य पदक : 5 ची जिल्ह्याने कमाई केली.
गोवा येथे होणाऱ्या राष्ट्रीय किकबॉक्सिंग स्पर्धेकरिता 6 सुवर्णपदक विजेत्या खेळाडूंची निवड झाली. या यशाबद्दल रुरल अँड अर्बन किक बॉक्सिंग असोसिएशन, लातूरचे अध्यक्ष- खय्युम तांबोळी, सचिव- के वाय पटवेकर, कार्यकारणी सदस्य- संतोष तेलंगे, क्राईस्ट इंटरनॅशनल स्कूल अँड ज्युनियर कॉलेज, तळेगाव चे संस्थाध्यक्ष जीवनकुमार मद्देवाड प्राचार्या जेबाबेरला नादार, शाळा समन्वयक संगमेश्वर ढगे, क्रीडा शिक्षक- इस्माईल शेख, कै. नरसिंहराव चव्हाण विद्यालय, नळेगावचे मुख्याध्यापक चेतन चव्हाण, बालाजी राजमाने, विश्वजीत येनकुरे, अर्चना राठोड यांनी यशस्वी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले. यशस्वी विद्यार्थ्यांना प्रशिक्षक- विक्रम गायकवाड यांचे मार्गदर्शन लाभले.
0 Comments