Latest News

6/recent/ticker-posts

खाजगी बसेसमध्ये अवाजवी भाडेवाढ केल्यास करता येणार तक्रार

खाजगी बसेसमध्ये अवाजवी भाडेवाढ केल्यास करता येणार तक्रार


लातूर : दि. 18 -  राज्यातील नागरीक दिवाळी सणानिमित्त मोठ्या प्रमाणात गावी येत व जात असतात. त्यासाठी ते खाजगी प्रवासी बसेसचा वापर करीत असतात. त्यादरम्यान खाजगी प्रवासी बसेस चालककाडून मनमानी भाडे वाढ आकारण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे प्रवाशांची लुबाडणूक होण्याची शक्यता असते. त्याअनुषंगाने शासनाने 27 एप्रिल, 2018 रोजी निर्णय जारी करुन राज्यातील खाजगी कंत्राटी प्रवाशी वाहनांची कमाल भाडेदर निश्चित केले आहेत. त्यानुसार कमाल भाडेदर महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या त्याच प्रकारच्या बसेसच्या टप्पा वाहतुकीच्या सद्यास्थितीच्या प्रती किलो मीटर भाडेदराच्या 50 टक्के पेक्षा अधिक राहणार नाही , असे निश्चित केले आहेत.

भाडेवाढ करणाऱ्या खाजगी वाहतूकदारांकडून वाजवीपेक्षा जास्त प्रवाशी भाडे आकारल्यास त्याबाबतची तक्रार करण्यासाठी rto.24-mh@gov.in या ई-मेल आयडीचा वापर करावा. त्यासोबत प्रवास कोठून कुठपर्यंत केला त्याची माहिती, तिकीट , वाहनाचा क्रमांक प्रवाशांनी सदर तपशिलासह तक्रार दाखल केल्यास संबंधित वाहना विरोधात कार्यवाही करण्यात येणार असल्याचे लातूर विभागाचे प्रादेशिक परिवहन अधिकारी विनोद चव्हाण यांनी एका प्रसिध्दीपत्रकाद्वारे कळविले आहे.

Post a Comment

0 Comments