नूरजहाँ हबीबसाब पटवेकर यांचे निधन
पुणे : मूळचे लातूर जिल्ह्यातील(गाव भागातील) पटेल चौक,लातूर येथील नूरजहाँ हबीबसाब पटवेकर यांचे निधन इन्ना लिल्लाही व इन्ना इलैही रजिऊन आज दिनांक 17 ऑक्टोंबर वार गुरुवार रोजी पहाटे साधारणता 4 : 00 वाजता कलवड वस्ती, खान गल्ली, लोहगाव पुणे येथे त्यांच्या मुलाच्या राहत्या घरी प्रदीर्घ आजाराने वयाच्या 85 व्या वर्षी दुःखद निधन झाले. त्यांच्यावर आज गुरुवार जोहर नमाज नंतर दुपारी 2 : 00 वाजता येरवडा, पुणे येथील कब्रस्थानमध्ये दफनविधी(अंतीमसंस्कार) करण्यात येणार आहे. त्यांच्या पश्चात दोन मुले, तीन सुना व दोन मुली, जावई नातू-पणतू असा मोठा परिवार आहे. समदानी पटवेकर यांच्या त्या आई होत व पत्रकार के वाय पटवेकर यांच्या त्या आईच्या आई आजी होत "मराठी अस्मितेचा इशारा" परिवारातर्फे भावपूर्ण श्रद्धांजली.
0 Comments