क्राईस्ट इंटरनॅशनल स्कूलचा क्रीडा क्षेत्रात जिल्ह्यात द्वितीय क्रमांक; दीड लाखांचे रोख पारितोषिक पटकावले
लातूर : तळेगाव ता. 9 - महाराष्ट्र शासन व जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय लातूर यांच्यावतीने 2022-23 व 2023 -24 या शैक्षणिक वर्षात क्राईस्ट इंटरनॅशनल स्कूल अँड ज्युनियर कॉलेज तळेगाव शाळेने दोन्ही वर्षी जिल्ह्यातून द्वितीय क्रमांक मिळवून १.५ लाख रुपयांचे रोख पारितोषिक पटकावले. लातूर जिल्ह्याच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा शाळेने हे यश संपादन करून रोवला आहे.
यासाठी क्रीडा शिक्षक- इस्माईल शेख, राहूल अडसूळ, मार्शल आर्ट कोच- विक्रम गायकवाड यांचे विशेष सहकार्य लाभले. याचे श्रेय क्रीडा विभागाच्या टीमला नेहमी सहकार्य करणारे पालक आणि मेहनतीने, जिद्दीने खेळणारे विद्यार्थी विद्यार्थिनी यांनाही जाते. मागील वर्षात अर्णव रेड्डी, परवेज शेख, आरती पुणे, केतन माने, अर्णव स्वामी, दत्ता फड, अमान पठाण, राजनंदिनी ऐतवाड, ऋषिकेश कासनाळे या खेळाडूंनी राष्ट्रीय स्तरावर नेत्रदीपक कामगिरी केली. महाराष्ट्र शासनाच्या पुरस्कार रूपाने मिळालेली शाळेसाठी सर्वोत्कृष्ट कार्याची ही पावती आहे. या यशाबद्दल संस्थाध्यक्ष जीवनकुमार मद्देवाड, सीईओ रितू मद्देवाड यांनी शाळेच्या प्राचार्य यांच्यासह क्रीडा विभागाचे अभिनंदन केले. पीटीए असोशिएशन, पालक तसेच अनेक वर्गातूनही यशाचे कौतुक केले जात आहे.
0 Comments