देवणी तालुक्यात वीज पडून सहा जनावरे दगावली
देवणी : {प्रतिनिधी / विक्रम गायकवाड} तालुक्यातील देवणी खुर्द येथे आज दि. 31 ऑक्टोंबर वार गुरुवारी संध्याकाळी 4:00 ते 5:00 वाजण्याच्या दरम्यान अचानक झालेल्या पावसात वीज पडून सहा जनावरे दगावल्याची दुर्दैवी घटना घडली. या घटनेत लहू तुळशीराम पाटील यांची दोन म्हशी, दोन गायी, तसेच एनगेवाडी येथील दत्तू राम शिवराम व्यंजने यांची एक म्हैस व एक गाय दगावली. एकूण सहा जनावरे या दुर्घटनेत मृत्युमुखी पडली.
घटनेची त्वरित दखल घेत देवणीचे तहसीलदार यांनी घटनास्थळी पंचनामा करण्यासाठी देवणी खुर्द सज्जाचे तलाठी यांना पाठवले असल्याचे समजते. ग्रामस्थांच्या वतीने, दुर्घटनाग्रस्त शेतकऱ्यांना नुकसान भरपाई लवकरात लवकर देण्यात यावी, अशी मागणी होत आहे.
0 Comments