पुण्याच्या एमआयटी विद्यापीठाचा राजा माने यांना समर्पित जीवन पुरस्कार
पुणे : (प्रतिनिधी/मुस्तफा सय्यद) पुण्याच्या एमआयटी विश्र्वशांती विद्यापीठाच्या वतीने संपादक, माध्यम तज्ज्ञ व राजकीय विश्लेषक तसेच डिजिटल मिडिया संपादक पत्रकार संघटना महाराष्ट्रचे संस्थापक अध्यक्ष राजा माने यांना पत्रकारितेतील योगदानाबद्दल "समर्पित जीवन गौरव पुरस्कार जाहीर झाला आहे. लोणी काळभोर येथे होत असलेल्या जागतिक विश्र्वशांती परिषदेत दि. ४ ऑक्टोबर रोजी या पुरस्काराचे वितरण होणार असल्याचे संयोजक एमआयटीचे संस्थापक अध्यक्ष डॉ.विश्वनाथ कराड व भारताच्या महासंगणकाचे जनक शास्रज्ञ डॉ.विजय भटकर यांनी कळविले आहे.
जगातील शास्त्रज्ञ,तत्त्वज्ञ आणि विश्र्वशांती चळवळीतील विचारवंत सहभागी होत असलेल्या दहाव्या जागतिक विश्र्वशांती परिषदेचे आयोजन दि.३,४ व ५ ऑक्टोबर रोजी लोणी काळभोर येथील विश्वराज बाग येथे करण्यात आले आहे.
0 Comments