निलंगा येथे 2 हजार 165 अधिकारी, कर्मचारी यांना निवडणूक प्रशिक्षण
लातूर : (जिमाका) दि. 27 - विधानसभा सार्वत्रिक निवडणूक २०२४ चा कार्यक्रम जाहीर झाला असून प्रत्यक्ष मतदान २० नोव्हेंबर, २०२४ रोजी होणार आहे. यासाठी २३८- निलंगा विधानसभा मतदारसंघात नियुक्त २ हजार १६५ मतदान अधिकारी व कर्मचारी यांचे प्रथम प्रशिक्षण रविवार , २७ ऑक्टोबर २०२४ रोजी दोन सत्रामध्ये निलंगा येथील केतकी मंगल कार्यालय येथे घेण्यात आले. जिल्हा निवडणूक अधिकारी श्रीमती वर्षा ठाकुर घुगे यांच्या मार्गदर्शनाखाली २३८- निलंगा विधानसभा मतदारसंघाचे निवडणूक निर्णय अधिकारी शरद झाडके यांच्या अध्यक्षतेखाली हे प्रशिक्षण पार पडले. पहिल्या सत्रामध्ये १ हजार ८३ व दुसऱ्या सत्रामध्ये १ हजार ८२ मतदान अधिकारी यांचे प्रशिक्षण घेण्यात आले. प्रशिक्षणार्थ्यांना त्यांच्याकडील फॉर्म १२ स्विकारण्याची व्यवस्था करण्यात आली होती.
२३८- निलंगा विधानसभा मतदारसंघाचे निवडणूक निर्णय अधिकारी शरद झाडके यांनी निवडणूक विषयक प्रशिक्षण दिले. तसेच निवडणुकीमध्ये सर्वसाधारण समस्यांचे अनुभव सांगून सर्व मतदान केंद्राध्यक्ष व मतदान अधिकाऱ्यांना मार्गदर्शन केले. तसेच २३८- निलंगा विधानसभा मतदारसंघामध्ये मतदान प्रक्रियेत कोणत्याही त्रुटी राहू नयेत, यासाठी प्रयत्न करण्याचा संकल्प सर्व केंद्राध्यक्ष व मतदान अधिकारी यांनी केला. एलईडीव्दारे देण्यात आलेल्या प्रशिक्षणानंतर प्रत्यक्ष ईव्हीएम हाताळण्याचे प्रशिक्षण सर्व प्रशिक्षणार्थ्यांना देण्यात आले. प्रशिक्षणात गैरहजर असणाऱ्या प्रशिक्षणार्थ्या विरुध्द लोकप्रतिनिधी कायदा १९५१ चे कलम १३४ नुसार नियमानुसार कार्यवाही करण्यात येणार असल्याची माहिती निवडणूक निर्णय अधिकारी झाडके यांनी सांगितले. प्रशिक्षणाच्या वेळी सहायक निवडणूक निर्णय अधिकारी प्रसाद कुलकर्णी, सोमनाथ वाडकर व गोविंद पेद्देवाड तसेच सर्व नायब तहसीलदार यांची उपस्थिती होती.
0 Comments