हातचलाखी करून सोन्याचे दागिने चोरणाऱ्या महिलेला 1 लाख 33 हजार रुपयाच्या मुद्देमालासह अवघ्या 10 दिवसात अटक
लातूर : शहरातील पोलीस ठाणे शिवाजीनगर हद्दी मध्ये एका सोन्या-चांदीचे दुकानातून दोन बुरखा परिधान केलेल्या महिलांनी हातचालाखी करून 18 ग्रॅम वजनाचे एक लाख 33 हजार रुपयाचे सोन्याचे नेकलेस चोरल्याची घटना घडली होती. त्यावरून पोलीस ठाणे शिवाजीनगर येथे अज्ञात बुरखा परिधान केलेल्या महिला विरुद्ध चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला होत. पोलीस अधीक्षक सोमय मुंडे ,अपर पोलीस अधीक्षक डॉ.अजय देवरे, यांचे मार्गदर्शनात स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक संजीवन मिरकले यांचे नेतृत्वात स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस अधिकारी व अमलदारांचे पथक तयार करून नमूद गुन्ह्याचा तपास करण्यात येत होता. सदर पथकाला सखोल मार्गदर्शन व सूचना आल्या होत्या. सदर पथकाकडून गुन्ह्या संदर्भात बारकाईने तपास सुरू असताना मोठ्या प्रमाणात बातमीदार नेमून मिळालेल्या माहितीचे विश्लेषण करून अज्ञात आरोपींचा शोध घेण्यासाठी परिश्रम घेण्यात येत होते.
वरिष्ठांचे मार्गदर्शनात सदरच्या पथकांनी केलेल्या परिश्रमामुळे पथकांना गुप्त बातमीदाराकडून हातचालाखी करून सोन्या-चांदीच्या दुकानातून दागिने चोरणाऱ्या महिला संदर्भात माहिती मिळाली की, नमूद चोरीतील महिला गुन्हेगार त्याने चोरलेला सोन्याचा मुद्देमाल विकण्यासाठी एक बुरखापरिधान केलेली महिला बसस्थानक ते गांधी चौक जाणारे रोडवर थांबलेली आहे. सदर माहितीची खातरजमा करून सदरचे पथक तात्काळ नमूद परिसरात सापळा लावून संशयित महिलेला ताब्यात घेतले. सदर पथकाने अतिशय कुशलतेने सराफा दुकानातून हातचालाखी करून सोन्याचे दागिने चोरणाऱ्या महिला आरोपीला दिनांक 03/10/2024 रोजी ताब्यात घेऊन त्याच्याकडे विचारपूस केली असता त्यांनी त्यांचे नाव
नाझिया मुकद्दर काजी उर्फ नाझिया आसिफ शेख, वय 37 वर्ष, राहणार पाण्याचे टाकी, पोलीस चौकी जवळ, शांतीनगर, सोलापूर. असे असल्याचे सांगितले. महिला पोलीस अंमलदार मार्फत सदर महिलेच्या ताब्यात असलेल्या प्लास्टिक पिशवीची झडती घेतली असता त्यामध्ये सोन्याचे एक नेकलेस मिळून आले. त्याबाबत त्याच्याकडे विचारले तेव्हा त्याने त्याची आई मुमताज नजीर शेख वय 60 वर्ष, राहणार मलिकार्जुन नगर, वेलकम हॉल जवळ, सोलापूर असे दोघी मिळून 10 ते 12 दिवसापूर्वी लातूर शहरातील एका सराफा दुकानातून हात चालाखीने एका घराचे सदरचा सोन्याचा नेकलेस चोरून ते आज रोजी विक्री करणार होती असे कबूल केले. त्यावरून नमूद महिलेला त्याने चोरलेला 01 लाख 33 हजार रुपये किमतीचा सोन्याचा नेकलेस सह ताब्यात घेऊन पुढील कारवाई करिता पोलीस ठाणे शिवाजीनगर यांचे ताब्यात देण्यात आले आहे. पुढील तपास सुरू आहे. वरिष्ठांचे मार्गदर्शनात स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलीस पथकाने अतिशय उत्कृष्टरित्या तपास करून हात चालाखी करून सोन्याचे दागिने चोरणाऱ्या बुरखा परिधान केलेल्या महिला आरोपीला ताब्यात घेऊन त्यांच्याकडून चोरलेला मुद्देमाल 100 टक्के हस्तगत केला आहे. सदरची कारवाई पोलीस अधीक्षक सोमय मुंडे, अपर पोलीस अधीक्षक डॉ.अजय देवरे, मार्गदर्शनात स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक संजीवन मिरकले यांच्या नेतृत्वातील पथकामधील पोलीस अमलदार संजय कांबळे, युवराज गिरी, जमीर शेख, सचिन धारेकर, महिला पोलीस अंमलदार घनघावे, भुसे यांनी केली आहे.
0 Comments