स्थानिक गुन्हे शाखेची अवैध धंद्यावर कारवाई; 01 लाख 60 हजार रुपयांचा प्रतिबंधित गुटखा व सुगंधित तंबाखू जप्त
लातूर : पोलीस अधीक्षक सोमय मुंडे यांनी अवैध धंद्यावर कठोर कारवाई करण्याचे निर्देशित केले आहे. त्या अनुषंगाने पोलीस अधीक्षक सोमय मुंडे, अपर पोलीस अधीक्षक डॉ.अजय देवरे, यांचे मार्गदर्शनात स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक संजीवन मिरकले यांचे नेतृत्वात स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस अधिकारी व अंमलदारांचे पथक तयार करून लातूर जिल्ह्यातील अवैध धंद्याची माहिती काढून त्यावर कारवाई करण्याची मोहीम राबवित आहेत. अवैध धंद्याची माहिती काढत असताना दिनांक 11/10/2024 रोजी स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलीस पथकास खात्रीशीर माहिती मिळाली की, पोलीस ठाणे औसा हद्दीमध्ये कुलसुम नगर येथील एका घरातील रूममध्ये महाराष्ट्र शासनाने प्रतिबंधित केलेले अन्नपदार्थ तंबाखूजन्य पदार्थाची अवैध विक्री व्यवसाय करण्यासाठी साठवणूक करण्यात आली आहे. अशी खात्रीशीर बातमी मिळाल्याने सदर माहितीची शहानिशा करून स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने दिनांक 11/10/2024 रोजी औसा शहरातील कुलसुम नगर येथील एका घरावर छापा मारला. तेथे महाराष्ट्र शासनाने बंदी घातलेले वेगवेगळ्या कंपनीचे, महाराष्ट्र राज्यामध्ये विक्रीसाठी प्रतिबंधित असलेले गुटका व सुगंधित पानमसाला असा एकूण 01 लाख 60 हजार 605 रुपयांचा प्रतिबंधित गुटखा व सुगंधित पानमसाला, तंबाखूचा मुद्देमाल मिळून आल्याने ते मुद्देमाल जप्त करण्यात आले आहे.
पोलीस ठाणे औसा येथे प्रतिबंधित गुटका व सुगंधित तंबाखूची अवैधरित्या साठवणूक केल्याचे मिळून आलेले इसम नामे रफिक एजाज शेख, वय 43 वर्ष राहणार लातूर तसेच प्रतिबंधित गुटखा व सुगंधित तंबाखूचा पुरवठा करणारे व्यापारी आयुब खान, राहणार बसवकल्याण जिल्हा बिदर राज्य कर्नाटक याचे विरुद्धपण गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस अमलदार रियाज सौदागर यांनी दिलेल्या फिर्यादवरून नमूद व्यक्तिरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस ठाणे औसा चे पोलीस करीत आहेत. सदरची कामगिरी वरिष्ठांचे मार्गदर्शनात,स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक संजीवन मिरकले यांचे नेतृत्वात पोलीस अमलदार खुर्रम काझी, युवराज गिरी, रियाज सौदागर,जमीर शेख यांनी पार पाडली.
0 Comments