Latest News

6/recent/ticker-posts

राज्यस्तरीय शालेय जुदो स्पर्धेत धाराशिव च्या सईनेचे सुवर्ण पथक

राज्यस्तरीय शालेय जुदो स्पर्धेत धाराशिव च्या सईचे सुवर्ण पथक

धाराशिव : क्रीडा व युवक सेवा संचालनालय आणि महाराष्ट्र ज्युदो संघटनेच्या वतीने म्हाळुंगे-बालेवाडी, पुणे येथे चालू असलेल्या राज्यस्तरीय शालेय ज्युदो स्पर्धेत धाराशिवच्या सई साप्ते हिने सुवर्ण पदक पटकाविले. सईची राष्ट्रीय शालेय ज्युदो स्पर्धेसाठी महाराष्ट्र संघात निवड झाली आहे.

धाराशिव येथील जिल्हा ज्युदो प्रशिक्षण केंद्र, तुळजाभवानी जिल्हा क्रीडा संकुलामध्ये अनंत केंद्रे, उदय काकडे, गणेश साप्ते व मनोज जाधवर यांच्या मार्गदर्शनाखाली सराव करणाऱ्या सई साप्तेने ३२ किलो खालील मुलींच्या वजनी गटातून सुवर्णपदक पटकाविले. सईच्या कामगिरीबद्दल जिल्हा ज्युदो संघटनेचे अध्यक्ष नितीन काळे, कार्याध्यक्ष अविनाश गडदे, उपाध्यक्ष अमर सुपेकर, सचिव प्रवीण गडदे, सहसचिव अशोक जंगमे, कोषाध्यक्ष अभय वाघोलीकर, कार्यकारिणी सदस्य व स्पर्धा विभाग प्रमुख प्रतापसिंह राठोड, पी.पी. जाधव, रवींद्र जाधव, तांत्रिक समिती सचिव कैलास लांडगे, साई राठोड, डी एन तलवाडे आदींसह जिल्ह्यातील ज्युदोपटू, मार्गदर्शक, पालक यांच्यातून अभिनंदन होत आहे.

Post a Comment

0 Comments