Latest News

6/recent/ticker-posts

रोटरी सॅटेलाइट क्लब ऑफ लातूर अस्पिरेशन तर्फे सीपीआर (जीवन संजीवनी) कार्यशाळा संपन्न

रोटरी सॅटेलाइट क्लब ऑफ लातूर अस्पिरेशन तर्फे सीपीआर (जीवन संजीवनी) कार्यशाळा संपन्न

लातूर : जागतिक हृदय दिनानिमीत्त २९ सप्टेंबर रोजी रोटरी सॅटेलाइट क्लब ऑफ लातूर अस्पिरेशन तर्फे सीपीआर (जीवन संजीवनी) कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यशाळेत १०० सामान्य नागरिकांना आणि विध्यार्थ्यांना सीपीआर (जीवन संजीवनी) चे प्रशिक्षण देण्यात आले.

एखादा व्यक्ती चालत -बोलत -फिरत असताना अचानक कोसळला आणि काहीही प्रतिसाद देत नसेल, त्याचा श्वास थांबला असेल तर त्याच्या हृदयाचे स्पंदनदेखील थांबले असे समजावे. या कार्डियाक अरेस्टच्या आणीबाणीच्या परिस्थितीत कशा पद्धतीने प्रथमोपचार करावे, त्याच्या थांबलेल्या हृदयाचे कार्य कसे चालू करावे या गोष्टीबद्दल या कार्यसत्रात मार्गदर्शन करण्यात आले. हॉस्पिटलच्या बाहेर येणारे सत्तर टक्के (७०%) कार्डियाक अरेस्ट हे घरात येतात. त्यामुळे घरातील प्रत्येक सदस्यांला सीपीआर (जीवन संजीवनी) चे तंत्र माहित असणे आवश्यक आहे असे भूलतज्ञ डॉ. रविकिरण आंधळे यांनी सांगितले. अत्यंत सोप्या, जगमान्य आणि शास्त्रीय पद्धतीने दोन्ही हातांचा वापर करून छातीवर दबाव देण्याच्या पद्धतीचा सराव या कार्यशाळेत उपस्थितांकडून करून घेण्यात आला. वैद्यकीय मदत उपलब्ध होईपर्यंत छाती दोन इंच खाली दबेल अशा पद्धतीने मिनिटाला १००-१२० वेळा छातीवर दबाव देण्यामुळे जीव वाचू शकतो असे डॉ. रोहित माले यांनी सांगितले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी डॉ. लड्डा विनोद, रो. श्रीमंत कावळे, रो. डॉ. अर्चना लड्डा, रो. सौ. आनंदा सुनील कोचेटा, रो. सौ. माधुरी वलसे, आणि प्रकल्प प्रमुख सुरेखा गिरी, रो. वनिता लाचुरिया, रो. कौशल्या सोनकवडे, रो. मैना कावळे, रो. सौ. अर्चना होळीकर, रो. सोनाली पेन्सलवार आणि सर्व सदस्यांनी परिश्रम घेतले. राजीव गांधी चौकातील रोटरी हॉल या ठिकाणी हा कार्यक्रम संपन्न झाला.

Post a Comment

0 Comments