Latest News

6/recent/ticker-posts

'माझं लातूर' च्या आंदोलनास मजविप महानगर शाखेचा पाठिंबा

'माझं लातूर' च्या आंदोलनास मजविप महानगर शाखेचा पाठिंबा


लातूर : गेल्या अनेक वर्षांपासून रखडलेल्या लातूरच्या जिल्हा रुग्णालयाचा प्रश्न ऐरणीवर घेऊन, त्यासाठी निधीच न देणाऱ्या शासनाच्या निषेधार्थ 'माझं लातूर' चळवळीच्या भीक मागो आंदोलनास मराठवाडा जनता विकास परिषदेच्या लातूर महानगर शाखेने रविवारी जाहीर पाठिंबा दिला. या संदर्भातील लेखी पत्र महानगर शाखेचे अध्यक्ष जयप्रकाश दगडे यांनी काल प्रसिद्ध केले असून, त्यावर मजविप अभ्यासगट प्रमुख ॲड. भारत साबदे, महेंद्र जोशी, सचिव प्रा. विनोद चव्हाण, ईश्वरचंद्र बाहेती, प्रकाश घादगिने, उस्मानभाई शेख, प्रा. एन.बी.रेड्डी, प्रा. बी.एस. पळसकर, प्रा. भालचंद्र येडवे, राजेंद्र वनारसे प्रभृतींच्या स्वाक्षऱ्या आहेत. 

लातूरच्या नियोजित जिल्हा रुग्णालयाकरिता शासनाने परभणी येथील वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाच्या अखत्यारीतील लातूरच्या कृषी महाविद्यालयाची १० एकर जागा खरेदी करण्यासाठी फक्त ३ कोटी ३२ लाख ६८ हजार ६५० रुपये निधी मंजूर केल्याचे शासकीय परिपत्रक प्रसिध्द केले होते. ही प्रक्रिया ६० दिवसांत पूर्ण करण्याचा सरकारी आदेशही होता. तथापि, मंजूर झालेल्या निधीतील फुटकी कवडीही सरकारने, शंभरावर दिवस उलटूनही प्रत्यक्ष दिली नाही.

सरकारच्या ह्या नाकर्तेपणाचा निषेध म्हणून माझं लातूरने मंत्र्यांचे मुखवटे लावून अभिनव असे भीक मागो आंदोलन सुरु केले. या आंदोलनास मजविप महानगर शाखेने पाठिंबा जाहीर केला आहे.

Post a Comment

0 Comments