क्राईस्ट इंटरनॅशनल स्कूलचा ( CBSE ) दहावीचा निकाल 100 टक्के
अहमदपूर : तालुक्यातील तळेगाव येथील क्राईस्ट इंटरनॅशनल स्कूल अँड ज्युनिअर कॉलेजचा केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाचा ( CBSE ) इयत्ता १० वीचा निकाल १०० टक्के लागला असून शाळेच्या वतीने यशस्वी विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला आहे.
शाळेतून आशिष प्रकाश लोखंडे याने ९२ टक्के गुण घेऊन प्रथम तर अथर्व प्रशांत उगीले, कु. संस्कृती शिवशंकर होनराव हिने ९१ टक्के गुण घेऊन व्दितीय तर सोहम साचिदानंद मलूरवार याने ८८ टक्के गुण घेऊन तृतीय क्रमांक मिळवला, गणपती गिरीष तेललवार हा ८६ टक्के गुण घेऊन शाळेतून चतुर्थ ठरला. विद्यालयातून एकूण ३० परीक्षार्थ्यांनी परीक्षा दिली होती. त्यापैकी १६ विद्यार्थी विशेष प्रविण्यामध्ये व ०९ विद्यार्थी प्रथम श्रेणीमध्ये तर ०५ विद्यार्थी तृतीय श्रेणीमध्ये उत्तीर्ण झाले आहेत. या यशाबद्दल दी. एन. टी. सी. सी. सोसायटी व जे. एम. ई. सोसायटीचे अध्यक्ष जीवनकुमार मद्देवाड, सीईओ रितू जीवनकुमार मद्देवाड, प्राचार्या जेबाबेरला नादार, शाळा समन्वयक संगमेश्वर ढगे यांनी यशस्वी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले.
0 Comments