‘पोलिस महासंचालक’ या पदकासाठी लातूर जिल्ह्यातील सात पोलिसांची निवड
त्याआनुषंगाने महाराष्ट्र राज्याचे पोलिस महासंचालक श्रीमती रश्मि शुक्ला यांनी लातूर जिल्ह्यातील सात पोलीस अधिकारी व अमलदारांची या मानाच्या पदकसाठी निवड केली आहे. यामध्ये पोलीस उपनिरीक्षक संजय भोसले, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक शिवाजी जाधव, माधव केंद्रे, अरुण डोंगरे, बाळासाहेब मस्के, पोलीस अमलदार परमेश्वर अभंगे, शिवाजी गुरव यांचा समावेश आहे. लातूर पोलिस दलातील मानाच्या पदकावर लातूर जिल्ह्यातील सात पोलिस अधिकारी अंमलदारांनी आपले नाव कोरल्याने जिल्हा पोलिस दलाच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला गेला आहे. पोलीस महासंचालक यांचे सन्मान चिन्ह पटकावलेल्या पोलीस अधिकारी व अमलदार यांचा जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर-घुगे, पोलीस अधीक्षक सोमय मुंडे यांनी पुष्पगुच्छ देऊन सन्मान केला व शुभेच्छा दिल्या.
0 Comments