छत्रपती शाहू ज्युनिअर कॉलेज, निटूर बारावी निकालात उज्वल यशाची परंपरा कायम
निटूर : (21 मे 2024) महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे (राज्य मंडळ) घेण्यात आलेल्या बारावीच्या परीक्षेचा निकाल जाहीर करण्यात आला असून, यामध्ये येथील छत्रपती शाहू ज्युनिअर कॉलेजच्या कला, वाणिज्य व विज्ञान शाखेचा एकूण 97.35 टक्के निकाल लागला आहे. महाविद्यालयाने मागील कांहीं वर्षापासून निटूर व परीसरातील ग्रामीन विद्यार्थांच्या शैक्षणिक विकासामध्ये भर घालण्याचे कार्य केले आहे. फेब्रुवारी/मार्च 2024 च्या बोर्ड परीक्षेच्या निकालात घवघवीत यश संपादन केले आहे.
महाविद्यालयातून एकुण 151 विद्यार्थी परीक्षेस प्रविष्ट झाले होते त्यातील 22 विद्यार्थी विशेष प्राविण्यासह उत्तीर्ण झाले आहेत. तसेच 113 विद्यार्थी प्रथम श्रेणीत तर 12 विद्यार्थी द्वितीय श्रेणीत उत्तीर्ण झालेले आहेत. कला 93% वाणिज्य 100% विज्ञान शाखा 100 टक्के लागला कु. घोरपडे अंकिता गणपत 85.83%( प्रथम ) संस्कृत 100 गुण, कु.बुडगे वैष्णवी विरनाथ 81.67%( द्वितीय ) संस्कृत 100 गुण, कु.शेख सानिया इलाही 81.17% (तृतीय ),वाणिज्य शाखेचा 100% निकाल लागला असुन या शाखेतुन कु.लांबोटे साक्षी सखाराम 75.00% (प्रथम), कु.नरसींगे प्रणाली प्रकाश 74.67%(द्वितीय), येळीकर अनिकेत शिवलिंग 71.83% (तृतीय )आणि कला शाखेचा 93% निकाल लागला आहे या शाखेतून कु. राऊतराव पल्लवी जनक 73.67% व कु.डांगे स्वप्ना संजय73.67% (प्रथम), कवडे ज्ञानेश्वर मलकू 70.83% (द्वितीय) , कु.नाचिबोने तनूजा राम 69.50%(तृतीय)आले आहेत.
महाविद्यालयातील विज्ञान शाखेतील तीन विद्यार्थ्यांनी द्वितीय भाषा संस्कृत विषयामध्ये 100 गुण प्राप्त केले आहेत. गुणवंत विद्यार्थ्यांचे संस्थेचे सचिव बाबासाहेब पाटील, प्राचार्य आनिल सोमवंशी, जाधव डि.आर, प्रा. संतोष सोमवंशी, श्रीमती सोमवंशी बी.जी., प्रा. कदम सी. डी., प्रा. जाधव जितेंद्र, प्रा.कांबळे शरद, प्रा. जाधव सतिष, प्रा.एस.पी. वाघमारे, प्रा.इंगलवाड व्हि. के., प्रा.भोजने सचिन, श्रीमती भारती ए. एन. प्राध्यापक,शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी ,पालकांनी आभिनंदन केले.
0 Comments