Latest News

6/recent/ticker-posts

छत्रपती शाहू विद्यालयाची उज्वल यशाची परंपरा कायम

 छत्रपती शाहू विद्यालयाची उज्वल यशाची परंपरा कायम

निटूर :  महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे घेण्यात आलेल्या दहावी परीक्षेचा निकाल जाहीर करण्यात आला असून, यामध्ये येथील छत्रपती शाहू विद्यालय, निटूर  94.73  टक्के  निकाल लागला आहे. विद्यालयाने मागील कांहीं वर्षापासून निटूर व परीसरातील ग्रामीन विद्यार्थांच्या शैक्षणिक विकासामध्ये भर घालण्याचे कार्य केले आहे. फेब्रुवारी/ मार्च २०२४ च्या बोर्ड परीक्षेच्या निकालात घवघवीत यश संपादन केले आहे. महाविद्यालयातून एकुण 38 विद्यार्थी परीक्षेस प्रविष्ट झाले होते त्यातील 21 विद्यार्थी विशेष प्राविण्यासह उत्तीर्ण झाले आहेत. तसेच 11 विद्यार्थी प्रथम श्रेणीत तर 5 विद्यार्थी द्वितीय श्रेणीत उत्तीर्ण झालेले आहेत.

विद्यालयातुन कु. तत्तापुरे रुतुजा नारायणन 96 % ( प्रथम ),  कु.  निटूरे राजकन्या दत्तात्रय 95 % ( द्वितीय ), कु. शिवणे आम्रता संतोष 93.20% (तृतीय ) क्रमांक मिळविला आहे.गुणवंत विद्यार्थ्यांचे संस्थेचे सचिव  बाबासाहेब पाटील, प्राचार्य आनिल सोमवंशी, जाधव डि.आर, जाधव एम. आर., बाचीफळे एस.आर., सुर्यवंशी एस एल., श्रीमती. जाधव एस. एस., गिरी बी. सी., सौ. माटेकर मॅडम, धसवाडीकर, सौ. सोमवंशी कल्याणी, प्रा. संतोष सोमवंशी, डावळे एन. व्ही. आदी प्राध्यापक, शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी ,पालकांनी आभिनंदन केले.

Post a Comment

0 Comments