Latest News

6/recent/ticker-posts

अनुभव शिक्षा केंद्राच्या माध्यमातून विषमुक्त शेती व आंबा उत्पादन मार्गदर्शन शिबिर

अनुभव शिक्षा केंद्राच्या माध्यमातून विषमुक्त शेती व आंबा उत्पादन मार्गदर्शन शिबिर

देवणी : (प्रतिनिधी/विक्रम गायकवाड) तालुक्यातील बोंबळी खुर्द या गावात विषमुक्त शेती व विषमुक्त अन्न व तसेच आंबा लागवड व उत्पादन या विषयाला घेऊन शिबिराचे आयोजन केले होते या वेळी प्रमुख पाहुणे म्हणून महेश बिरादर (आंबा उत्पादक समिति महाराष्ट्र सदस्य), राजकुमार सस्तापुरे (जील्हा  अध्यक्ष  शेतकरी संघटना ) ज्ञानेश्वर सूर्यवंशी (श्रमिक हक्क समिति अध्यक्ष) प्रमुख मार्गदर्शक व पाहुणे म्हणून उपस्थित होते यावेळी या शिबिराचे सूत्रसंचालन महादेव कोठे यांनी केले.

तर कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रसाद चव्हाण यांनी केले यावेळी मार्गदर्शन करताना सेंद्रिय शेतीचे महत्व व तसेच आजच्या काळात केमिकल युक्त शेतीमुळे आपल्या जीवनमूल्यवर होणारा परिणाम यावरती भर देण्यात आला व तसेच आजच्या युवकांनी शेतीकडे वळले पाहिजे आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून शाश्वत पीक घेऊन आपली आर्थिक बाजू सुधारण्यासाठी आपल्याला शेतीला जोडधंदा म्हणून पर्यावरणाला पूरक व तसेच शेतीला एक व्यवसाय म्हणून आजच्या युवकांनी बघितलं पाहिजे यामुळे शेतकरी सदन होऊ शकेल झिरो बजेट वापरून आपल्या सभोवताली असलेल्या काडी, कचरा, उकंडे, जीवामृत स्लेरी फिल्टर, बॉयोकपोस्टखत निर्मिती संसाधनाचा उपयोग करून सेंद्रिय शेतीचे महत्व पटवून देण्यात आले व आजच्या युगात वृक्ष लागवड व वृक्ष जोपासना हे किती महत्त्वाचे आहे याच्यापासून आपल्या जीवनमूल्यवर कशाप्रकारे परिणाम करतो या विषयाला घेऊन शेतकऱ्याबरोबर संभाषण करण्यात आले. यावेळी बोंबळी गावातील अनेक प्रतिष्ठित शेतकरी व युवा वर्ग उपस्थित होते हे शिबिर संपन्न करण्यासाठी सामाजिक कार्यकर्ते अमोल भोसले, सिद्धेश्वर मिरचे यांनी परिश्रम घेतले. आभार अमोल भोसले यांनी मानले.

Post a Comment

0 Comments