Latest News

6/recent/ticker-posts

विश्वशांती बुद्ध विहार सेलू येथे समता सैनिक दलाचे प्रशिक्षण शिबिर उत्साहात

विश्वशांती बुद्ध विहार सेलू येथे समता सैनिक दलाचे प्रशिक्षण शिबिर उत्साहात

बी डी उबाळे 

औसा : भारतीय बौद्ध महासभा तालुका शाखा लातूर च्या वतीने लातूर तालुक्यातील सेलू(बु) येथील विश्वशांती बुद्ध  विहारांमध्ये समता सैनिक दलाचे एक दिवशी प्रशिक्षण शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. प्रथम तथागत सम्यक संबुद्ध व बोधिसत्व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमांना पुष्प, धुप व दिपाने सामूहिक वंदन करण्यात आले.

या प्रशिक्षण शिबिराच्या अध्यक्षस्थानी तालुकाध्यक्ष दत्तात्रय भोसले उद्घाटक म्हणून जिल्हाध्यक्ष एम.एम.बलांडे तर प्रमुख पाहुणे म्हणून संरक्षण विभाग जिल्हा उपाध्यक्ष मेजर जनरल राजाराम साबळे, संरक्षण विभाग महिला जिल्हा उपाध्यक्ष केंद्रीय शिक्षिका मंगलताई सुरवसे, जिल्हा उपाध्यक्ष हिराचंद गायकवाड, या शिबिरामध्ये डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी समता सैनिक दलाची निर्मिती का केली व पूर्वज आणि शौर्यगाथा याची माहिती देण्यात आली. लाटी, काटी सह ड्रिल, उंची प्रमाणे लाईन, संविधानिक अधिकार, आयपीसी कायदा व ॲट्रॉसिटी ॲक्ट, प्रथम उपचार अशा विविध विषयावर मार्गदर्शन करण्यात आले. सकाळी 9.00 ते सायंकाळी 5.00 वाजेपर्यंत हे शिबिर संपन्न झाले. यामध्ये महिला आणि छोट्या बालकांचा मोठा सहभाग दिसून आला.

या शिबिराला प्रशिक्षक म्हणून डिव्हिजन ऑफिसर विकास दंतराव, डिव्हिजन ऑफिसर विलास आल्टे, जिल्हा सचिव अभिमन्यू लामतुरे या शिबिरासाठी लातूर तालुका उपाध्यक्ष पवन कांबळे शेलुकर यांच्या पुढाकारातून शिबिर संपन्न झाले. या शिबिरासाठी सेलू, धनेगाव, भाडगाव, हालकी, येथील यूवक उपस्थीत होते. शिबिर यशस्वी करण्यासाठी रवी कांबळे, आदिनाथ सूर्यवंशी, देवराव जोगदंडे, लक्ष्मण कांबळे, प्रेसेंजित जोगदंड, नाना कांबळे, संतोष कांबळे, भैयासाहेब कांबळे सह सेलू येथील उद्धव गायकवाड, उद्धव, कांबळे, बालाजी कांबळे, महादेव कांबळे, विश्वनाथ कांबळे, बब्रूवान कांबळे, विश्वभर कांबळे, राजाभाऊ गायकवाड, जयश्रि कांबळे, लता कांबळे, संगीता कांबळे, आश्विनी कांबळे, दिव्या कांबळे, उपासक उपासिका यांनी परिश्रम घेतले कार्यक्रमाचे आभार संयोजक तालुका उपाध्यक्ष पवन कांबळे सेलूकर यांनी आभार मांनले व कार्यक्रमाची सांगता सरणतय या धम्मपालन गाथेने करण्यात आली.

Post a Comment

0 Comments