Latest News

6/recent/ticker-posts

समस्त भादेकराच्या आर्थिक सहभागातून साकारले भव्य नागोबा मंदिर

समस्त भादेकराच्या आर्थिक सहभागातून साकारले भव्य नागोबा मंदिर


बी डी उबाळे 

औसा : औसा तालुक्यातील भादा येथे समस्त (प्रत्येक) भादेकरांच्या आणि परिसरातील दानशूर भाविक भक्ताच्या,नागरिकांच्या,शेतकऱ्याच्या आर्थिक सहभागातून साकारले भव्य दिव्य सुंदर नागोबा मंदिर देवस्थानचा जीर्णोद्धार करण्यात आला असून येथे भव्य दिव्य अशी नागोबा मंदिर बांधकाम शिल्प कला साकारून तालुक्यातील ही पहिलीच बांधकाम इमारत शिल्पकला वापरून विविध प्रकारच्या वास्तू कलेचे दर्शन घडवत हे मंदिर बांधकाम निर्माण करण्यासाठी गेल्या 16 महिन्यापासून वापरलेली अदभुत शिल्पकला आणि विज्ञानवादी कलेच्या दृष्टिकोनाचा वापर करून हे भव्य मंदिर बांधकाम उभारण्यात आले असल्याचे दिसून येते. बांधकाम पूर्णत्वानिमित्त भादा येथील ऐतिहासिक धार्मिक उत्सवाचे सामूहिक नियोजन करण्यात आले आहे.

 मंदिराची आवस्थां सध्या अत्यंत खराब झाली होती, यामुळे भाविक भक्त,नागरिकांच्या इच्छेप्रमाने या मंदिराचा जीर्णोद्धार करण्याचे नियोजन गावामध्ये दिवाळीच्या पाडव्यादिवशी एक सर्व धर्मीय उपस्थित सामूहिक प्रयत्नांतून बैठक घेऊन 16 महिन्यापूर्वी बांधकाम नियोजन करण्यात आले. श्री नागोबा मंदिर देवस्थानचा जीर्णोद्धार, कलशारोहण सोहळा, अखंड हरिनाम सप्ताह आणि ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण,श्रीमद् भागवत कथा ज्ञानयज्ञ सोहळा सप्ताह आयोजन दिनांक 08 ते 15 एप्रिल 2024 रोजी या कालावधीत हा सोहळा सप्ताह आयोजित करण्यात आला असून भागवताचार्य आत्माराम शास्त्री महाराज आळंदी, कलशारोहण सोहळा हभप दत्तस्वरूप सद्गुरू आप्पा बाबा महाराज रुईभर यांच्या हस्ते तर औसा तालुका वारकरी सांप्रदाय अध्यक्ष तथा भादेकर सुपुत्र खंडू लटूरे महाराज यांच्या सानिध्यात या धार्मिक,आध्यात्मिक सोहळ्या सोबतच मुख्य आकर्षण म्हणजे भादा येथे नवदाम्पत्य आपल्या नवं जीवनाच्या गृहस्थाश्रमात प्रवेश करण्यासाठी अतुर असून उपस्थीत सोहळ्यातील सर्व मान्यवरांच्या आशीर्वादाने सागर - स्वाती च्या विवाह सोहळ्याचे आयोजन यामध्ये भादेकर ग्रामस्थांनी केले आहे. तरी आगळे वेगळे असे भव्य नियोजन सोहळ्यास तालुक्यातील आणि जिल्ह्यातील भाविक भक्तांनी या विविध प्रकारच्या धार्मिक,सार्वजनिक, ऐतिहासिक उपक्रमाचा याची देही,याची नयनी साक्षीदार आवश्य व्हावे असे आवाहन सोहळा संयोजन समिती आणि समस्त ग्रामस्थ भादा ता औसा यांच्याकडून करण्यात येत आहे.

Post a Comment

0 Comments