ॲङ विजयगोपाल अग्रवाल मुकबधिर विद्यालयाचे चित्रकला, क्रीडा स्पर्धेत यश
लातूर:(प्रतिनिधी/एन.जे.बिराजदार) जीवन विकास प्रतिष्ठान द्वारा संचलित ॲङ विजयगोपाल अग्रवाल मुकबधिर विद्यालयातील विद्यार्थ्यांनी मुंबई येथे झालेल्या रंगोत्सव सेलिब्रेशन चित्रकला स्पर्धेत तसेच बाभळगाव येथील पोलीस मुख्यालयाच्या मैदानावर झालेल्या जिल्हास्तरीय दिव्यांग विद्यार्थ्यांच्या क्रीडा स्पर्धेत घवघवीत यश संपादन केले. चित्रकला स्पर्धेत योगेश मंदे याने फिंगर्स ॲन्ड थम्ब प्रकारात आंतरराष्ट्रीय आर्ट मिरीट ॲवार्ड पटकाविले. अमित वाघमारे याने कॉलेज मेकींग प्रकारात आंतरराष्ट्रीय मेडल तर अजय आमले याने ड्रॉईंग व कलरिंग प्रकारात विजेतेपद पटकाविले. यासह ठाणे येथे झालेल्या द ड्रीम फॅमिली स्पर्धेत अजय आमले, योगेश मंदे, ओमकार सुर्यवंशी यांनी सुवर्ण पदक पटकाविले.
यासह दिव्यांगांच्या जिल्हास्तरीय क्रीडा स्पर्धेत ओमकार सुर्यवंशी – 50 मीटर धावणे, लांबउडी (प्रथम), गणेश बंडगर – 50 मीटर धावणे (द्वितीय), प्रवीण दावलबाजे – लांबउडी, गोळाफेक (प्रथम), साईराज मुटटे – 100 मीटर धावणे (प्रथम), आदित्य दासरे – लांबउडी (द्वितीय), साईनाथ यम्मे – 100 मीटर धावणे (द्वितीय), गंगाप्रसाद आंबटवाड – 200 मीटर धावणे (प्रथम), शुभम देशपांडे – 200 मीटर धावणे (द्वितीय), त्रिरत्न कांबळे – गोळाफेक (प्रथम), प्रशांत राठोड -400 मीटर धावणे (द्वितीय), सचिन पाटील – लांबउडी (प्रथम), गणेश आवारे – 200 मीटर धावणे (द्वितीय), अमित वाघमारे – 400, 200 मीटर धावणे (प्रथम), दशरथ जाधव – गोळाफेक (द्वितीय) यांनी यश मिळविले. विद्यालयास 10 प्रथम व 07 द्वितीय पारितोषिकासह सांघिक उपविजतेपदाचा बहुमान मिळाला. यशस्वी विद्यार्थ्यांना कलाशिक्षक संजय मंडाळे, क्रीडा शिक्षक महेश पाळणे, नंदकुमार थडकर, संजय बुरांडे, संगमेश्वर आनंदा यांचे मार्गदर्शन लाभले. यशस्वी विद्यार्थ्यांचे कौतुक जिल्हा समाज कल्याण अधिकारी, संतोषकुमार नाईकवाडी, वैसाका राजु गायकवाड, सहायक सल्लागार बाळासाहेब वाकडे यांनी केले. चित्रकला व क्रीडा स्पर्धेतील विजेत्या विद्यार्थ्यांचा सत्कार संस्थेचे अध्यक्ष जयसिंहराव देशमुख, संजय निलेगावकर यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी मुख्याध्यापक संतोष देशमुख यांच्यासह शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांची उपस्थिती होती.
0 Comments