पाणी टंचाईने भादा शिवारातील ज्वारीपीक संकटात,नागरिकांना लागणार भाव वाढीचा मोठा झटका!
बी डी उबाळे
औसा : तालुक्यातील पाणी टंचाईने भादा शिवारातील ज्वारी संकटात सापडली असून नागरिकांना लागणार भाव वाढीचा मोठा झटका! अशी परस्थित्ती सध्या तालुक्यातील पाणी संकटामुळे निर्माण झाली आहे. ग्रामीण भागातील मुख्य अन्नाची गरज म्हणजे भाकरी असून या भाकरीच्या शोधत मानव प्राणी दिवसरात्र मेहनत करताना दिसून येते पण त्याची गरज पूर्ण झाल्याची दिसून येत नाही.
अशा मध्येच यावर्षी निसर्गाच्या अवकृपमुळे व लहरीपणामुळे सध्या निर्माण झालेली पाणीटंचाई आणि याच पाण्याच्या उपलब्धतेमुळे आवश्यक असणारे खाद्य हे रब्बी ज्वारी या उत्पादनावर मोठा परिणाम झाला असून याचे एकरी उत्पन्न पाण्याअभावी अगदीच शुल्लक निघत असून या उत्पन्नावर कोणत्याही शेतकऱ्याना लागणारे वर्षभरासाठीचे अन्नधान्य हे शेतीमधून उपलब्ध न झाल्याने आणि ते बाजारात मोठ्या प्रमाणात विक्रीसाठी न आल्याने बाजार भाव ही तेजीत राहणार असून शेतकरी शेतमजुरांना आवश्यक असणारी वार्षिक अन्नधान्याची गरज यावर मोठा दुष्परिणाम होणार असून भाव वाढीलाही या पाणीटंचाईचा मोठा फटका बसणार असल्याचे चित्र सध्या औसा तालुक्यामध्ये दिसून येत आहे.
सध्या देशामध्ये वाढणारा महागाईचा भस्मासुर हा काही कमी होत नाही परंतु विविध उपलब्ध साधने यांची उपलब्धी कमी झाल्याने महागाईमध्ये आणखी सर्वसामान्य शेतकरी नागरिकांना निसर्गाकडून आणि शासनाकडूनही झोकून दिले जात आहे. यामुळे सर्वसामान्यांचे दैनंदिन जीवन व्यथित करणे हे मोठे कठीण होत चालले असल्याचे चित्र सध्या औसा तालुक्यामध्ये मोठ्या प्रमाणात दिसून येत आहे.
0 Comments