देवणी तालुक्यातील धनेगाव येथे कार ट्रकचा अपघात कारमधील चौघे जागीच ठार
देवणी : (प्रतिनिधी/विक्रम गायकवाड) तालुक्यातील धनेगाव जवळ आज दुपारी झालेल्या भीषण अपघातात चार जण जागीच ठार झाले. या अपघातात मृत व्यक्ती हे मध्यप्रदेशातील इंदोर येथील कापडाचे व्यापारी असल्याची प्राथमिक माहिती समोर आली.
या बद्दल घटनास्थळावरून मिळालेली माहिती अशी की, आज दुपारी Ertiga कार (एम पी ०९ डी ई ५२२७) ही वलांडीहून निलंगा शहराकडे जात होती. त्यावेळी समोरून येणारा ट्रक ( एम एच २४ जे ७३६५) आणि कारची जोराची धडक झाली. या अपघातात कारमधील चौघांचा जागीच मृत्यू झाला.
अपघात एवढा भीषण होता की, कारचा चेंदामेंदा झाला. कार ही जेसीबीच्या सहाय्याने बाजुला काढण्यात आली. यावेळी देवणी पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक माणिकराव डोके व सहकारी यांनी घटनास्थळी दाखल होत, चौघांचे मृतदेह हे वलांडी येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात शवविच्छेदनासाठी नेण्यात आले. घटनास्थळी नागरिकांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती.
0 Comments