बोरोळ जिल्हा परिषद प्रशालेचे तीन विद्यार्थी जवाहर नवोदय साठी निवड
देवणी : (प्रतिनिधी/विक्रम गायकवाड) तालुक्यातील बोरोळ येथील जि.प.प्रशालेचे सृष्टी सत्यवान म्हेत्रे, स्नेहा लक्ष्मण म्हेत्रे, आदर्श खंडेराव सूर्यवंशी, या तीन विद्यार्थ्यांची जवाहर नवोदय विद्यालयाच्या प्रवेश पूर्व परीक्षेत यश संपादन केल्याने त्यांची लातूरच्या नवोदय विद्यालयात पुढील शिक्षणासाठी निवड झाली आहे.
या निवडीबद्दल शाळेचे मुख्याध्यापक जी.आर राठोड, शालेय व्यवस्थापन समिती अध्यक्ष ज्ञानेश्वर शेंडगे, शाळेतील शिक्षक व शिक्षिका यांच्या उपस्थितीमध्ये विद्यार्थ्यांचे ग्रामस्थांच्या वतीने सत्कार करण्यात आला व पूढील कार्यास शुभेच्छा देवून अभिनंदन करण्यात आले.
0 Comments