Latest News

6/recent/ticker-posts

लातूर जिल्हा क्रीडा संकुल येथे 16 एप्रिल पासून विविध खेळांचे मोफत उन्हाळी क्रीडा प्रशिक्षण शिबीर

लातूर जिल्हा क्रीडा संकुल येथे 16 एप्रिल पासून विविध खेळांचे मोफत उन्हाळी क्रीडा प्रशिक्षण शिबीर


15 एप्रिलपर्यंत नाव नोंदणी करण्याचे आवाहन

लातूर : क्रीडा व युवक सेवा संचालनालय अंतर्गत लातूर जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय आणि लातूर जिल्हा क्रिडा प्रशिक्षण केंद्राच्यावतीने क्रीडा संघटनाअकॅडमीमार्फत 16 ते 25 एप्रिल, 2024 या कालावधीत विविध खेळांचे सर्व वयोगटातील विद्यार्थी खेळाडूंसाहती मोफत क्रीडा प्रशिक्षण शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. हे शिबीर सन 2024-2025 च्या स्पर्धेच्या पूर्वतयारी लक्षात घेवून घेण्यात येणार आहे. तसेच शिबीरामध्ये शासनाचे क्रीडा मार्गदर्शक तसेच संघटनाइतर अकॅडमीचे तज्ज्ञ क्रीडा मार्गदर्शकराष्ट्रीयआंतरराष्ट्रीय खेळाडू व तज्ज्ञ पदाधिकारी यांच्याद्वारा खेळनिहाय तंत्रशुध्द प्रशिक्षण देण्यात येणार आहे. जिल्हा क्रीडा संकुल येथे क्रिकेट,खो-खोकुस्ती,मैदानी,रायफलशुटींगलॉन


टेनिसजिम्नॅस्टिक्समल्लखांबयोगाव्हॉलीबॉलफुटबॉलबॅडमिंटनबॉक्सिंगज्युदोकराटेस्केटींगबेसबॉलसॉफ्टबॉल इत्यादी खेळांचे प्रशिक्षण देण्यात येणार आहे. तसेच अहमदपूर येथे तलवारबाजीसायकलिंगशुटिंग बॉलरग्बीआट्यापाट्याकबड्डीबास्केटबॉलहॅण्डबॉलफ्लोअर बॉल इत्यादी खेळांचे, उदगीर येथे फुटबॉलव्हॉलीबॉल, तर मुरुड येथे वुशु.व्हॉलीबॉलबॉक्सिंगक्रिकेटबॅडमिंटन इत्यादी खेळांचे प्रशिक्षण देण्यात येणार आहे. प्रशिक्षण शिबीर नि:शुल्क असून विद्यार्थी, खेळाडू यांनी जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयलातूर येथे क्रीडा मार्गदर्शक जयराज मुंडे (भ्रमणध्वनी क्र. 8275273917) आणि चंद्रकांत लोदगेकर (भ्रमणध्वनी क्र. 9834988239) यांच्याकडे 15 एप्रिल, 2024 पर्यंत आपली नाव नोंदणी करावी. जिल्ह्यातील विविध शाळेतील क्रीडा शिक्षकमुख्याध्यापक व पालक यांनी जास्तीत जास्त मुलांना या उन्हाळी प्रशिक्षण शिबीराचा लाभ घेण्यासाठी प्रोत्साहित करावेअसे आवाहन जिल्हा क्रिडा अधिकारी जगन्नाथ लकडे यांनी केले आहे.


Post a Comment

0 Comments