Latest News

6/recent/ticker-posts

क्रांतीसुर्य महात्मा ज्योतिबा फुले यांच्या जयंती उत्सव समिती लातुरच्या अध्यक्षपदी उमेश अंबादास कांबळे यांची निवड

क्रांतीसुर्य महात्मा ज्योतिबा फुले यांच्या जयंती उत्सव समिती लातुरच्या अध्यक्षपदी उमेश अंबादास कांबळे यांची निवड

लातूर :  डॉ.बाबासाहेब आंबेडकर पार्क येथे संपन्न झालेल्या बैठकीत क्रांतीसुर्य महात्मा ज्योतिबा फुले यांच्या जयंती साजरी करण्यासंदर्भात आयोजित बैठकीत सर्वानुमते यावर्षी वैचारिक व प्रबोधनात्मक कार्यक्रमांनी जयंती साजरी करण्याचे ठरवले. क्रांतीसुर्य महात्मा ज्योतिबा फुले यांच्या जयंती कार्यकारणीत जयंती उत्सव समितीच्या अध्यक्षपदी उमेश कांबळे, कार्याध्यक्षपदी राम बुरबुरे, स्वागताध्यक्षपदी भारत काळे, सचिवपदी बाळासाहेब फासे, कोषाध्यक्ष पदी तुलसीदास गोंदकर, सह कोषाध्यक्ष म्हणून संतोष माळी तर प्रसिद्धी प्रमुख म्हणून डी.उमाकांत निवड करण्यात आली.

या बैठकीस गत वर्षीचे अध्यक्ष सचिन गायकवाड, ॲड.गोपाळ बुरबुरे, पद्माकर वाघमारेसर, ॲड.बालाजी गाडेकर, प्रज्वल उबाळे, रणजित आचार्य, पांडुरंग माळी, नागनाथ पोलकर, सुरेंद्र तिडके, अक्षय हालके, किशोर माळी, संतोष माळी, माळी डी.के यांच्या सह अनेक मान्यवर उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments