Latest News

6/recent/ticker-posts

वलांडी घटनेच्या निषेधार्थ लातूरात हिंदु जन आक्रोश मोर्चा

वलांडी घटनेच्या निषेधार्थ लातूरात हिंदु जन आक्रोश मोर्चा

लातूर : देवणी तालुक्यातील वलांडी येथील एका सातवर्षीय बालिकेवर लैंगिक अत्याचाराची घटना घडल्यानंतर सर्वत्र संताप व्यक्त करण्यात येत आहे. या अमानुष घटनेच्या निषेधार्थ आणि आरोपी नराधमाला फाशीची शिक्षाच झाली पाहिजे या व इतर मागण्यांसाठी लातूर शहरात आज 5 फेब्रुवारी रोजी सकाळी 10:00 वाजताच्या दरम्यान गंजगोलाई येथील जगदंबा देवीच्या मंदिरापासून जिल्हाधिकारी कार्यालयावर हिंदू जनआक्रोश मोर्चा काढण्यात आला. या मोर्चामध्ये महिलांची उपस्थिती मोठ्या संख्येने होती. लातूर शहरातील संपूर्ण बाजारपेठ बंद होती. सर्व दुकाने, प्रतिष्ठाने बंद ठेवून लातूरकरांनी आज कडकडीत बंद पाळला. दरम्यान हिंदु जनअक्रोश मोर्चा गंजगोलाई येथील जगदंबा देवी मंदिरापासून महात्मा गांधी चौक, डॉ. आंबेडकर पार्क, छत्रपती शिवाजी महाराज चौक मार्गे जुने जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकला. सातवर्षीय बालिकेवर लैंगिक अत्याचार करणार्या आरोपी नराधमाला फाशी द्या, वलांडी येथील अमानुष घटनेचा जाहीर निषेध, मानवतेला काळीमा फासणार्या वलांडी घटनेचा जाहीर निषेध, नारी पे अत्याचार मानवता शर्मशार, फाशची शिक्षा झालीच पाहिजे.. अशा घोषणा या मोर्चामध्ये दिल्या जात होत्या.. मोर्चात सर्वांना भगव्या टोप्या, भगवे झेंडे व निषेधाच्या घोषणाचे फलक झळकत होते. या मोर्चात महिला, पुरुष, नागरिक हजारोंच्या संख्येने सहभागी झाले होते. लातूरच्या जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर घुगे यांच्या मार्फत राज्याचे मुख्यमंत्री, गृहमंत्री, देशाचे पंतप्रधान, देशाचे गृहमंत्री यांना निवेदन देण्यात आले.

वलांडी येथील बालिकेवर अत्याचार प्रकरण फास्ट ट्रॅक न्यायालयात चालवून आरोपीला फाशीची शिक्षा देण्यात यावी. षिचापीडित बालिकेच्या कुटुंबियांना पोलिस संरक्षण देण्यात यावे, संपूर्ण प्रकरणाचा निकाल लागे पर्यंत आरोपीला व कुटुंबीयांना गाव बंदी करण्यात यावी अशा विविध मागण्यां या हिंदू जनअक्रोश मोर्चाच्या वतीने निवेदनाद्वारे करण्यात आल्या आहेत.

Post a Comment

0 Comments