जिल्हा रुग्णालय संदर्भात माझं लातूर परिवाराची मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत बैठक - आमदार संभाजी पाटील निलंगेकर
लातूर : लातूर जिल्हा रुग्णालयाचा प्रश्न तात्काळ मार्गी लावावा यासाठी येत्या काही दिवसात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत माझं लातूर परिवाराची बैठक लावली जाईल असे आश्वासन आमदार संभाजी पाटील निलंगेकर यांनी माझं लातूर परिवाराच्या शिष्टमंडळास दिली आहे.
माझं लातूर परिवाराच्या शिष्टमंडळाने जिल्हा रूग्णालय या विषयावर आमदार निलंगेकर यांच्याशी भेट घेऊन लातूर जिल्हा रुग्णालयाचा प्रलंबित प्रश्न तात्काळ निकाली काढण्यासाठी पुढाकार घ्यावा अशी विनंती केली. माझं लातूर परिवाराने केलेल्या बेमुदत साखळी उपोषणास भेट देऊन आमदार संभाजी पाटील निलंगेकर यांनी शासनाचा प्रतिनिधी म्हणून हा विषय मार्गी लावू असा विश्वास देऊन उपोषण स्थगित करण्याची विनंती केली होती. त्यानुसार माझं लातूर परिवाराने उपोषण तात्पुरते स्थगित करण्याचा निर्णय घेतला होता.
गेल्या तीन महिन्यात आपण आरोग्य मंत्री, कृषी मंत्री यांना भेटून जिल्हा रुग्णालय संदर्भात निर्णय घेण्याची मागणी केली होती मात्र शासन स्तरावर कसलाही प्रतिसाद न मिळाल्याने आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत निर्णायक बैठक घेतली जाईल अशी माहिती निलंगेकर यांनी दिली आहे. या बैठकीसाठी आपण मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पत्र पाठवून बैठकीसाठी वेळ देण्याची विनंती केली असल्याचे त्यांनी सांगितले आहे. माझं लातूर परिवाराच्या वतीने सतीश तांदळे, दिपरत्न निलंगेकर, अभय मिरजकर, डॉ. सितम सोनवणे, संजय स्वामी, काशिनाथ बळवंते, के वाय पटवेकर, ॲड. राहूल मातोळकर, गोपाळ झंवर यांची बैठकीस उपस्थिती होती.
0 Comments