महाराष्ट्र शासनाच्या शालेय शिक्षण विभागाचा महत्वपूर्ण निर्णय; सर्व माध्यमांच्या पूर्व प्राथमिक आणि प्राथमिक शाळा आता सकाळी 9:00 किंवा त्यानंतरच भरतील
मुंबई : सतीश तांदळे(विशेष वृत्त संपादक) महाराष्ट्र शासनाच्या शालेय शिक्षण विभागाने आज अतिशय महत्वाचा निर्णय घेतला असून राज्यातील सर्व माध्यमांच्या पूर्व प्राथमिक आणि प्राथमिक शाळा आता सकाळी 9:00 किंवा त्यानंतरच भरतील असा शासकीय अध्यादेश काढला आहे.
शालेय शिक्षण विभागाने घेतलेल्या या महत्वपूर्ण निर्णयाचे राज्यातील सर्वच स्तरातून आणि विशेषतः पालक वर्गातून स्वागत केले जात आहे. शालेय बालकांच्या मानसिक आणि शारीरिक दृष्टीने अत्यंत गरजेचे असणारा हा निर्णय शिक्षण विभागाने घेतला असून या निर्णयाची अंमलबजावणी देशभरातील सर्व माध्यमातील पूर्व प्राथमिक आणि प्राथमिक शाळेत झाली पाहिजे असा सूर आळवला जात आहे. एकंदरीत शासनाच्या या निर्णयामुळे राज्यातील लाखो शालेय बालक आणि त्यांचे पालक यांना दिलासा भेटला आहे.
0 Comments