Latest News

6/recent/ticker-posts

नळेगाव येथे मोफत सर्व रोग निदान शिबिर

 नळेगाव येथे मोफत सर्व रोग निदान शिबिर 


नळेगाव: येथे श्री साई हॉस्पिटल क्रिटिकल केअर लातूर व अनिल चव्हाण मित्र मंडळ नळेगाव यांच्या संयुक्त विद्यमाने नववर्षानिमित्य आयोजित मोफत रोगनिदान, स्त्री रोग, नेत्र रोग व दंत रोग शिबिर आयोजित करण्यात आले होते. या शिबिरास उदंड प्रतिसाद मिळाला असून सर्वरोग 448 व नेत्ररोग 200 असे एकूण 648 हुन अधिक रुग्णाची तपासणी करण्यात आली तर 60 रुग्णाची मोतीबिंदू शस्त्रक्रिया साठी निवड करण्यात आली. 

उदघाटन सोहळ्याचे अध्यक्ष म्हणून सरपंच  सुर्यकांतराव चव्हाण हे उपस्थित होते तर प्रमुख तज्ञ डॉ गजानन हलकंचे, डॉ. मंजूषा हलकंचे शेटे, नेत्ररोग तज्ञ डॉ. पवन सावंत, दंतरोग तज्ञ डॉ. पवन खिचडे, डॉ. सागर गारठे, डॉ. इर्शाद सय्यद, डॉ. बिराजदार, डॉ. बालाजी पांचाळ, डॉ. अशोक नळेगावकर यांनी तपासणी केली. या वेळी प्रमुख पाहुणे उपसरपंच पद्मिनीबाई खांडेकर, माजी उपसरपंच पांडुरंग रेड्डी, माजी उपसरपंच घृष्णेश्वर मलशेट्टे, ग्राम पंचायत सदस्य उमाकांत सावंत, कावेरी गाडेकर,अशफाक मुजावर,शमीम कोतवाल, पत्रकार शिवाजी बरचे, सुनील भोसले, मुख्याद्यापक दिलीप मानखेडे, चेतन चव्हाण, सोमनाथ बिराजदार तसेच सुभाष बिराजदार, जीवन नळेगावकर व राजेंद्र माचवे आदी मान्यवर उपस्थित होते. गरजू रुग्णांना मोफत BP, रक्तातील Sugar, ECG तपासणी व मशीन द्वारे डोळ्याची तपासणी, मशिनद्वारे स्तनाच्या कर्करोगाचे निदान व उपचार करण्यात आले. तसेच उपलब्धतेनुसार औषधे मोफत वाटप करण्यात आले.

शिबिराच्या यशस्वीतेसाठी संतोष तेलंगे, सत्यवान सावंत, अडत व्यापारी असोसिएशन अध्यक्ष अमजद घोरवाडे, कैलास चव्हाण, राजू शेलार, महेश इरलेवाड, बालाजी सावंत, भद्रीनाथ सोनटक्के, अनिल पांचाळ, सत्यवान जाधव, बालाजी पेन्शलवार, मुक्तार भाई मुजावर, अमीर खुरेशी, भिवाजी गव्हाणे, ज्ञानेश्वर गाडेकर, संतोष बिराजदार, संजय सौदागर, श्याम जाधव, कृष्णा जाधव, तुकाराम मानखेडे, ज्योतिराम कवठाळे, हाजी गौडगावे, फैसल कोतवाल, व्यंकट माचवे, नवनाथ मानखेडे, अमोल पांचाळ, दीपक जाधव, किरण हुडगे, विजय ढोबळे पाटील, सुनील चव्हाण, मंगेश सारंग. बालाजी शेलार , जगदीश नळेगावकर, नागनाथ काटवटे, शाहूराज मानखेडे, ऋषी बिराजदार पाटील, अमोल सूर्यवंशी, पटेल ऑप्टिकलचे जुबेर पटेल, सिद्धेश्वर नाना गौड, शुभांगी देशमाने, सर्वज्ञा स्वामी व सौरभ कांबळे यांनी परिश्रम घेतले कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रमोद हुडगे व शैलेश रेड्डी यांनी केले तर आभार प्रदर्शन अनिल चव्हाण यांनी केले.

Post a Comment

0 Comments