राज्यस्तरीय सब-ज्युनियर तायक्वांदो स्पर्धेत माहिराला सुवर्णपदक; आरोहीला रजत तर आयान आणि आदित्यला कास्य पदक
लातूर: दि २१ जानेवारी ३३ व्या राज्यस्तरीय सब-ज्युनियर तायक्वांदो स्पर्धेत लातूर जिल्ह्यातील माहिरा इसरार सगरे हिने सुवर्ण पदकाची कमाई केली आहे तर आरोही मंचक राऊतराव हिने रजत तर आदित्य शर्मा व आयान असिफ पठाण यांना कास्य पदक प्राप्त झाले आहे. पुणे जिल्हातील फायटर्स तायक्वांदो ॲकडमी आयोजित उच्च शिक्षण व तंत्रज्ञान मंञी आमदार चंद्रकांत पाटील यांच्या सहकार्यातून शिव छञपती क्रीडा संकुल बालेवाडी येथे दि १८ ते २० जानेवारी दरम्यान पार पडलेल्या या स्पर्धेत पहिल्यांदाच तायक्वांदो खेळात लातूर जिल्हाची हि सर्वाधिक कमाई असुन तायक्वांदो खेळाकडे खेळाडुंचा कल वाढत असताना दिसत आहे.
सब-ज्युनियर तायक्वांदो स्पर्धा या ११ वर्षाखालील वयोगटात पार पडल्या. सुवर्ण पदक विजेती माहिरा इसरार सगरे हि राजा नारायनलाल लाहोटी शाळेतील इयत्ता पहिलीतील विद्यार्थिनी आहे तर ति आपली खेळातील चुणुक पहिल्याच स्पर्धेत दाखवली आहे. ति भविष्यात ऑलिम्पिक खेळाडु होण्याचे संकेत आत्ताच दिले असुन तिने या स्पर्धेत सर्वच फेऱ्या सर्वाधिक गुणांच्या फरकाने पार केल्या असल्याचे तिचे आशियाई तायक्वांदो प्रशिक्षक नेताजी जाधव यांनी सांगितले आहे. या स्पर्धेतील रजत पदक विजेती आरोही राऊतराव हि केशवराज विद्यालयात शिकत असुन तिचेही उत्कृष्ट प्रदर्शन होते. यशस्वी खेळाडूंचे सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे.
0 Comments