महाराष्ट्र विद्यालयात मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा... उपक्रमांतर्गत पालक मेळावा उत्साहात
निटूर: येथील महाराष्ट्र विद्यालयात मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा... उपक्रमांतर्गत पालक मेळावा घेण्यात आला. यावेळी प्रथम सत्र परीक्षा इयत्ता नववी, दहावी सराव, मध्ये प्रथम दहा, दहा विद्यार्थ्यांचा पारितोषिक देऊन सत्कार करण्यात आला.
महात्मा गांधीं अखिल भारतीय हिंदी राष्ट्र भाषा प्रसार आणि प्रचार संस्था, पुणे द्वारा आयोजित परीक्षेत उत्तीर्ण विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र, व मेडल वाटप करण्यात आले. याप्रसंगी महाराष्ट्र जुनिअर कॉलेज चे प्राचार्य. पी.पी. गायकवाड, राकेश दवणे, एस बी पोळकर यांनी दहावी नंतर पुढे काय करियर मार्गदर्शन याविषयावर मार्गदर्शन केले.
मराठी अस्मितेचा इशारा वृत्तपत्राचे संपादक के वाय पटवेकर, पत्रकार राजकुमार सोनी, रमेश शिंदे, रविकिरण सुर्यवंशी व इतर मान्यवरांची ऊपस्थिती होती. विद्यालयातून दहावी पर्यंत शिक्षण घेऊन वारकरी संप्रदायामध्ये पाखवाज वादक म्हणून महाराष्ट्र राजामध्ये नावलौकिक मिळवत असलेला माजी विद्यार्थी रमण विठ्ठल भोयबार या माजी विद्यार्थ्यांचा शाळेच्या वतीने राज्य पातळीवर पुरस्कार प्राप्त झाल्यामुळे सत्कार करण्यात आला.
शेवटी मुख्याध्यापक सुरेंद्र धुमाळ यांनी अध्यक्षीय समारोप केला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन एच एन भोयबार यांनी केले तर आभार प्रदर्शन अम्रता जगदाळे या विद्यार्थिनी मानले यावेळी महिला पालक व पुरुष पालक, नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
0 Comments