शालेय विद्यार्थ्यांनी घेतला आर्थिक व्यवहाराचा अनुभव उर्दू शाळेत ‘खरी कमाई' उपक्रमास प्रतिसाद
नळेगाव: दि.20 - अल फारुख उर्दू शाळेत विद्यार्थ्यांसाठी 'खरी कमाई' हा उपक्रम शनिवारी (दि. 20) घेण्यात आला. यानिमित्त विद्यार्थ्यांनी घरून बनवून आणलेल्या विविध प्रकारच्या खाद्यपदार्थांची विक्री करत आर्थिक व्यवहाराचा अनुभव घेतला. यावेळी ७५ पेक्षा अधिक खाद्यपदार्थांचे स्टॉल विद्यार्थ्यांनी लावून २७ हजारांची उलाढाल झाल्याची माहिती मुख्याध्यापक वहाब जागीरदार यांनी दिली.
खरी कमाई या कार्यक्रमाचे उद्घाटन शाळेचे अध्यक्ष नजीब जागीरदार यांनी फित कापून केले. विद्यार्थ्यांना व्यवहार ज्ञान व्हावे, बाजारातील वस्तुची किंमत कळावी, व्यवसायाची माहिती मिळावी, खरेदी विक्रीचे व्यवहार समजावेत, नफा-तोटा यांची प्रत्यक्ष माहिती मिळावी, तसेच व्यवहारीक संवाद कसे करावेत यासाठी आनंदनगरी उपक्रमाचे आयोजन करण्यात आले.
या कार्यक्रमात विद्यार्थ्यांनी घरून बनवून आणलेल्या पुरी, खिचडी, चिवडा, वडापाव, चकल्या, जामून, बिर्याणी, खीर, समोसे, विक्रीसाठी ठेवल्या होत्या. किराणा दुकान, स्टेशनरी, खाद्यपदार्थ, भाज्या, फळे आदी दुकाने उभारण्यात आली होती.या वेळी प्राथमिक शाळेचे मुख्याध्यापक कादिर जागीरदार, मुजीब शेख, समद शेख, हुसेन घोरवाडे, इस्माईल सय्यद हाश्मी मोईनोद्दीन, इरशाद पिरजादे, कासिम शेख, लायक सौदागर, युनूस शेख, मुंजेवार बाबू, साहेबलाल कुरैशी, इलियास शेख, नुरोद्दीन तांबोळी, फय्याज सय्यद पालक सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी व सर्व विधार्थ्यांनी परिश्रम घेतले.
0 Comments