निर्भया फाउंडेशनतर्फे २०० मुली, महिलांना स्वसंरक्षणाचे प्रशिक्षण शिबिर
जळगाव:(प्रतिनिधी/आनंदकुमार ब्राह्मणे) जिल्ह्यासह राज्यात घडणाऱ्या महिला अत्याचाराच्या घटनांनी समाजमन अस्वस्थ होत आहे. अशा प्रकाराच्या घटना घडू नये, त्याचबरोबर त्याला प्रतिकार करण्यासाठी महिला व विद्यार्थिनींना स्वसंरक्षण करता यावे या उद्देशाने निर्भया फाउंडेशनतर्फे ८ ते ४० वर्षातील २०० मुली, महिलांना मोफत स्वसंरक्षणासह झुंडा डान्स, एरोबिक्सचे धडे देण्यात येत आहे. निर्भया फाउंडेशनतर्फे स्वसरंक्षण शिबिराला ५ जानेवारीपासून सुरूवात झाली असून ५ फेब्रुवारीला शिबिराचा समारोप होणार आहे. शिबिरात २०० मुली व महिलांनी सहभाग नोंदविला आहेत. यात झुंबा आणि एरोबिक्सचे
प्रशिक्षण डॉली आनंदकुमार, ज्युदो-कराटेचे प्रशिक्षण जिल्हा कराटे असोसिएशनचे सचिव बी. आनंदकुमार हे देत आहेत. अयोध्यानगरातील महाकालेश्वर मंदिराजवळील हॉलमध्ये महिलांना झुंबा डान्स, एरोबिक्सचे प्रशिक्षण देवून त्यांना फिटनेसच्या टिप्स देण्यात येत आहे. तसेच कालिंका मंदिराजवळ सायंकाळी ५.३० ते ६.३० तर अयोध्यानगरातील रामलिला गार्डन येथे सायंकाळी ६.३० ते ७.३० या दरम्यानात ज्युदो-कराटे शिकविले जात आहे. शिबिराच्या तिसही दिवशी हजेरी लावून प्रशिक्षण घेऊन उत्कृष्ट सादरीकरण करणाऱ्यांना मेडल देऊन सन्मानित करण्यात येणार आहे.
0 Comments