प्राचार्य बी.बी. पवार यांना राज्यस्तरीय गुणवंत शिक्षक पुरस्कार प्रदान
नवी मुंबई: येथील पी.ई.एस सेंट्रल स्कूल, सीबीडी बेलापूर या इंग्रजी माध्यमांच्या शाळेचे मुख्याध्यापक बी. बी. पवार यांना महाराष्ट्र राज्य शिवछत्रपती संघटनेच्या वतीने राज्यस्तरीय गुणवंत शिक्षक पुरस्कार कोकण विभाग अंतर्गत आमदार- ज्ञानेशवर म्हात्रे, आमदार-बालाजी किनीकर, आमदार निरंजन डावखरे यांच्या हस्ते अंबरनाथ येथे प्रदान करण्यात आला.
पी.ई.एस सेंट्रल स्कूल मुख्याध्यापक येथील बी. बी. पवार हे गेल्या वीस वर्षापासून बेलापुर येथील शैक्षणिक संस्थेच्या आध्यापक महाविदयालयात प्राचार्य म्हणून कार्यरत होते. गेल्या काही वर्षापासून ते सेंट्रल स्कूल या ठिकाणी मुख्याध्यापक म्हणून काम पाहत आहेत. दरम्यानच्या काळात नवीमुंबईतील अनेक सामाजिक धार्मिक संस्थाच्या सामाजिक प्रबोधनामध्ये त्यांचा मोलाचा वाटा आहे. इंग्रजी माध्यामांशी संबंधित अनेक निरनिराळ्या राज्यात होणाऱ्या शैक्षणिक परिषदामध्ये त्याची उपस्थित मोठी आहे.
नवीन शैक्षणिक धोरणाच्या अनुशंगाने शालेय स्थरावरील स्थितंतरे नवनवीन बदल त्यांनी आपल्य शाळेत रुजवण्याचा प्रयत्न गेल्या काही वर्षापासून करीत आहेत. त्यांना राष्ट्रीय तसेच सामाजिक धार्मिक पुरस्कार यापूर्वीही अनेक वेळा प्राप्त झालेले आहेत.
0 Comments