रस्ता सुरक्षा विषयक साहित्याचे उपप्रादेशिक परिवहन कार्यालयात वितरण सुरू
रस्ता सुरक्षा विषयक जनजागृती व प्रबोधन करण्यासाठीच्या साहित्याचे प्रकाशन जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर यांच्या उपस्थितीत प्रकाशन करण्यात आले आहे. या साहित्याचे वितरण कार्यालयात येणाऱ्या वाहनचालकांना मार्गदर्शन करून वाहनावर स्टिकर, पोस्टर्स आणि बॅनर्स लावण्यास सुरुवात करण्यात आली आहे.
मोटर वाहन निरीक्षक शितल गोसावी, संजय आडे यांच्या मार्गदर्शनाखाली परिवहन कार्यालयात या अभियानास प्रारंभ करण्यात आला आहे. या अभियानात लातूर परिवहन कार्यालयातील सर्व मोटर वाहन निरीक्षक, सहायक निरीक्षक यांनी सहभाग नोंदविला.
0 Comments